मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: हेडिंग्ले टेस्टमध्ये थोडक्यात वाचला अंपायरचा जीव! पाहा VIDEO

IND vs ENG: हेडिंग्ले टेस्टमध्ये थोडक्यात वाचला अंपायरचा जीव! पाहा VIDEO

हेडिंग्ले टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) जोरदार खेळ केला आहे. या खेळीच्या दरम्यान त्याच्या एका जोरदार शॉटमुळे लेग अंपायर  रिचर्ड कॅटलबरो यांचा जीव धोक्यात आला होता.

  • Published by:  News18 Desk

हेंडिंग्ले, 28 ऑगस्ट: हेडिंग्ले टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) जोरदार खेळ केला आहे. तिसऱ्या दिवशी पुजारानं 180 बॉलमध्ये नाबाद 91 रन केले आहेत. त्याच्या खेळामुळेच टीम तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 2 आऊट 215 रन केले आहेत.

पुजारानं या खेळीत 15 फोर लगावले आहेत. तसंच कॅप्टन विराट कोहलीसोबत (Virat Kohli) 99 रनची नाबाद भागिदारी केली आहे. विराट सध्या 45 रनवर नाबाद आहे. या टेस्टचा अजून 2 दिवसांचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दरम्यान पुजारानं लगावलेल्या शॉटमुळे लेग अंपायर रिचर्ड कॅटलबरो यांचा जीव धोक्यात आला होता.

पुजारानं 79 व्या ओव्हरमध्ये मोईन अलीच्या पहिल्या बॉलवर लेग अंपायरच्या दिशेनं जोरदार शॉट लगावला होता. अंपायर रिचर्ड त्यावेळी अलर्ट होते. त्यामुळे बॉल त्यांना लागण्याच्यापूर्वीच ते खाली वाकले. या गडबडीमध्ये त्यांचे संतुलन बिघडले. पुजारनं मारलेला तो फटका वेगानं बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला.

Google करू नका इथे वाचा कोण आहे भाविना पटेल; पोलिओने व्हिलचेअरवर बसवलं, पण Tokyo Paralympics मध्ये ऐतिहासिक कामगिरी

हेंडिग्ले टेस्टमध्ये टीम इंडियाच्या फॅन्सच्या आशा आता पुजारा आणि कोहली जोडीवर आहेत. या अनुभवी जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये जोरदार खेळ करत भारताच्या आशा कायम ठेवल्या आहेत. टीम इंडियाची पहिली इनिंग 78 रनवरच संपुष्टात आली होती. त्यानंतर इंग्लडनं पहिल्या इनिंगमध्ये 432 रन केले. 5 टेस्टच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या 1-0 नं आघाडीवर आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england