मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व, बुमराहनं जमलेली जोडी कशी फोडली पाहा

IND vs ENG: पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व, बुमराहनं जमलेली जोडी कशी फोडली पाहा

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्टची मालिका शुक्रवारी चेन्नईत सुरु झाली. पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडनं वर्चस्व गाजवलं.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्टची मालिका शुक्रवारी चेन्नईत सुरु झाली. पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडनं वर्चस्व गाजवलं.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्टची मालिका शुक्रवारी चेन्नईत सुरु झाली. पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडनं वर्चस्व गाजवलं.

चेन्नई, 5 फेब्रुवारी :  कोरोना ब्रेकनंतर अखेर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झालं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्टची मालिका शुक्रवारी चेन्नईत सुरु झाली. पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडनं वर्चस्व गाजवलं. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटच्या नाबाद 128 रनच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 263 रन केले आहेत.

जो रुटची सेंच्युरी

जो रुटची सेंच्युरी हे पहिल्या दिवसाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. रुटनं त्याच्या करियरमधील 20 वी सेंच्युरी 164 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीनं पूर्ण केली. रुटनं दिवसाच्या शेवटच्या सत्रात सेंच्युरी केली. सेंच्युरीनंतर रुटनं आणखी वेगानं रन जमवले. त्यानं आर. अश्विनला एक सिक्स देखील खेचला. रुटची ही शंभरावी टेस्ट आहे. शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी करणारा तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील नववा तर इंग्लंडचा तिसरा बॅट्समन आहे.

इंग्लंडच्या कॅप्टनसाठी 2021 हे वर्ष चांगलंच लाभदायी ठरलं आहे. त्यानं या वर्षातील सलग तिसऱ्या टेस्टमध्ये सेंच्युरी केली आहे. रुटनं श्रीलंका सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये 228 तर दुसऱ्या टेस्टमध्ये 186 रनची खेळी रुटनं केली होती. श्रीलंकेतील फॉर्म रुटनं चेन्नईतही कायम ठेवला आहे.

बुमराहनं दिला शेवटी धक्का

पहिल्या सत्रात दोन विकेट पडल्यानंतर  जो रुट आणि डॉब सिबले ( Dom Sibley) या जोडीनं इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी दुसरं संपूर्ण सत्र खेळून काढलं. तसंच तिसऱ्या सत्रामध्येही भारतीय बॉलर्सना दाद लागू दिली नाही.

डॉम सिबलेनं त्याची हाफ सेंच्युरी 159 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीनं झळकावली. रुट खेळत असताना त्याला एका बाजूनं खंबीर साथ देण्याचं काम त्यानं केलं. ओपनिंगला आलेला सिबले संपूर्ण दिवस खेळून काढणार असं वाटत असतानच जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) शेवटच्या ओव्हरमध्ये सिबलेला 87 रनवर आऊट केलं. सिबले आऊट झाल्यानंतर तीन बॉलचा खेळ बाकी होता. मात्र दोन्ही टीमच्या सहमतीनं खेळ थांबवण्यात आला.

जसप्रीत बुमराहची भारतामधील ही पहिलीच टेस्ट आहे. भारताकडून बुमराहनं दोन तर अश्विननं एक विकेट घेतली. अन्य कोणत्याही बॉलरला यश मिळाले नाही. बुमराहनं जमलेली जोडी फोडत टीम इंडियासाठी आशा दाखवली आहे. आता दुसऱ्या दिवशी चांगला खेळ करत इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल.

First published:

Tags: Cricket, India vs england