मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: मोठी बातमी! इंग्लंडच्या फास्ट बॉलरला कोरोना

IND vs ENG: मोठी बातमी! इंग्लंडच्या फास्ट बॉलरला कोरोना

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच हेडिंग्लेमधील लीड्स ग्राऊंडवर होत आहे. या टेस्टमधील दोन दिवसांचा खेळ बाकी असतानाच इंग्लंजच्या फास्ट बॉलरला कोरोना झाल्याची बातमी आहे.

  • Published by:  News18 Desk

हेडिंग्ले, 28 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच हेडिंग्लेमधील लीड्स ग्राऊंडवर होत आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं या टेस्टमध्ये पुनरागमन केलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 आऊट 215 रन केले आहेत. टीम इंडिया अद्यापही 139 रननं पिछाडीवर आहे.

हेडिंग्ले टेस्टमधील दोन दिवसांचा खेळ बाकी असतानाच इंग्लंजच्या फास्ट बॉलरला कोरोना झाल्याची बातमी आहे. फास्ट बॉलर ब्रायडन कार्स (Brydon Carse) याला कोरोना झाला आहे. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 'डेली मेल' च्या बातमीनुसार कार्सचा इंग्लंडच्या टीममध्ये सँटबाय म्हणून समावेश करण्यात आला होता.

स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स, मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर हे फास्ट बॉलर दुखापतग्रस्त झाल्यानंतर कार्स इंग्लंडकडून पदार्पण करण्याचं स्वप्न बघत होता. मात्र या स्वप्नांना धक्का बसला. कोरोनाची लागण झाल्यामुळे तो आता जवळपास संपूर्ण सीरिजमधून आऊट झाला आहे. 'द हंड्रेड' लीगच्या दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती.

IND vs ENG: हेडिंग्ले टेस्टमध्ये थोडक्यात वाचला अंपायरचा जीव! पाहा VIDEO

ब्रायडन कार्सनं पाकिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्ये सर्वांना प्रभावित केले होते. त्याने त्या सीरिजमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. तो नॉर्दन सुपरजार्जर्स टीमचा सदस्य होता. या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात त्याला कोरोनाची लागण झाली. ब्रायडेन मुळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. पण इंग्लडकडून क्रिकेट खेळण्यासाठी त्यानं आफ्रिकेला रामराम केला होता. आता इंग्लंडकडून टेस्ट खेळण्याचं त्याचं स्वप्न कोरोनामुळे लांबणीवर पडलं आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england