IND vs ENG: घरच्या मैदानावर अक्षरचा कहर, सलग तिसऱ्या इनिंगमध्ये केला पराक्रम

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडची सुरुवात खराब झाली आहे. या टेस्टमध्ये अक्षर पटेलनं (Axar Patel) एक खास पराक्रम केला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडची सुरुवात खराब झाली आहे. या टेस्टमध्ये अक्षर पटेलनं (Axar Patel) एक खास पराक्रम केला आहे.

  • Share this:
    अहमदाबाद, 4 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडची सुरुवात खराब झाली आहे. इंग्लंडचा ओपनर डॉम सिबले (Dom Sibley) याला अक्षर पटेलनं (Axar Patel) फार काळ खेळू दिलं नाही. अक्षरनं त्याच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर सिबलेला आऊट केलं. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) बॉलिंगमध्ये पहिला बदल करताना अक्षरच्या हातामध्ये बॉल दिला होता. अक्षरनं कॅप्टनचा हा विश्वास सार्थ ठरवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) हे अक्षर पटेलचं होम ग्राऊंड आहे. या मैदानावर त्याची कामगिरी जबरदस्त झाली आहे. त्यानं यापूर्वी याच मैदानावर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे अक्षरनं मागच्या टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेल्या सलग तीन टेस्ट इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्याचा पराक्रम अक्षरनं केला आहे. पहिल्या सीरिजमध्येच जबरदस्त कामगिरी अक्षर पटेलची इंग्लंड दौऱ्यासाठीच टीम इंडियात निवड झाली होती. त्याला दुखापतीमुळे पहिली टेस्ट खेळता आली नाही. चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्यानं पदार्पण केलं. त्यानंतर अक्षरनं सातत्यानं चांगली बॉलिंग केली आहे. विशेषत: बॉलिंगला आल्यावर लगेच विकेट घेण्याच्या त्याच्या कौशल्यानं टीमला मोठा फायदा होत आहे. त्यानं आत्तापर्यंत पाच इनिंगमध्ये बॉलिंग केली आहे. यापैकी तीन इनिंगममध्ये पहिल्या, एका इनिंगमध्ये दुसऱ्या तर एका इनिंगमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट घेतली आहे. त्याला पहिली विकेट घेण्यासाठी जास्तीत जास्त 20 बॉल लागले आहेत.  (हे वाचा : IND vs ENG  इंग्लंडनं टॉस जिंकला, बुमराहच्या जागी 'या' बॉलरचा समावेश ) टीम इंडियानं या टेस्टमध्ये एक बदल केला आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद सिराजचा (Mohammad Siraj) समावेश टीममध्ये करण्यात आला आहे. सिराज यापूर्वी देखील चेन्नईमध्ये बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये दुसरी टेस्ट खेळला होता. इंग्लंडच्या टीममध्येही दोन बदल करण्यात आले आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर यांच्या जागेवर डॉम बेस आणि डॅन लॉरेन्सचा समावेश करण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: