IND vs ENG : आणखी एकाला दुखापत, टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामधील (India vs England) तिसरा खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण टेस्ट सीरिजमधू आऊट झाला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामधील (India vs England) तिसरा खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण टेस्ट सीरिजमधू आऊट झाला आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 जुलै: इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) इंग्लंड दौऱ्यातून आऊट झाला आहे. पहिली टेस्ट सुरु होणाऱ्यापूर्वी दुखापतीमुळे बाहेर पडलेला सुंदर हा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल (Shubhman Gill) आणि राखीव फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) हे दोघं दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार  भारत आणि काऊंटी इलेव्हन यांच्यातील सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुंदरच्या बोटाला दुखापत झाली आहे. याच सामन्याच्या पहिल्या दिवशी आवेश खानच्या बोटाला दुखापत झाली होती. सुंदर आणि आवेश हे दोघंही या सामन्यात काऊंटी टीमकडून खेळत होते. काऊंटी टीमच्या काही खेळाडूंना कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानं आयसोलेशनमध्ये जावं लागलं होतं. त्यामुळे हे दोघंही काऊंटी टीमकडून टीम इंडियाच्या विरुद्ध खेळत होते. वॉशिंग्टन सुंदरचा एक ऑल राऊंडर म्हणून गेल्या काही महिन्यात उदय झाला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत सुंदरनं चांगला खेळ केला होता. तो दौरा सुरू होण्यापूर्वीच जखमी झाल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेला आणखी एक मोठा धक्का बदली खेळाडू कोण येणार? शुभमन गिल जखमी झाल्यानंतर त्याच्या बदली कोणता खेळाडू देण्यास निवड समितीनं नकार दिला होता. आता आवेश आणि सुंदर हे आणखी दोन खेळाडू दुखापतीमुळे दौऱ्यातून आऊट झाले आहेत. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या 24 सदस्यीय टीम इंडियाची संख्या 21 झाली आहे. आता बदललेल्या परिस्थितीमध्ये कुणी बदली खेळाडू इंग्लंडला पाठवायचा का यावर निवड समितीला पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published: