चेन्नई, 5 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं सेंच्युरी झळकावली आहे. रुटची ही शंभरावी टेस्ट आहे. शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी करणारा तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील नववा तर इंग्लंडचा तिसरा बॅट्समन आहे.
A hundred in his 100th Test for Joe Root 👏
Outstanding knock from the England skipper.#INDvENG | https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/KULnmIBRtA — ICC (@ICC) February 5, 2021
इंग्लंडची अवस्था 2 आऊट 48 अशी असताना जो रुट बॅटिंगला उतरला. या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या रुटनं सिबले सोबत तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची भागिदारी केली. श्रीलंकेविरुद्धच्या दोन टेस्टमध्येही रुट जबरदस्त फॉर्मात होता. त्या सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये 228 तर दुसऱ्या टेस्टमध्ये 186 रनची खेळी रुटनं केली होती. श्रीलंकेतील फॉर्मच रुटनं या चेन्नईतही कायम ठेवला आहे.
(हे वाचा-फक्त या एका माणसाने आयुष्यात सचिन तेंडुलकरला दिला होता भोपळा)
रुटचं हे 20 वे शतक आहे. तसंच त्यानं 19 अर्धशतकही झळकावले आहेत. रुट आणि सिबले यांच्या पार्टनरशिपमुळे इंग्लंडनं पहिल्या दिवशी भक्कम सुरुवात केली आहे. पहिल्या सत्रात दोन विकेट पडल्यानंतर या जोडीनं दुसरं संपूर्ण सत्र खेळून काढलं. यापूर्वी सकाळी इंग्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला होता.
भारताकडून पहिल्या सत्रामध्ये आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती. टीम इंडियानं या टेस्टमध्ये एकूण पाच बदल केले आहेत. चेन्नई टेस्टचं पिच तिसऱ्या दिवसापासून स्पिन बॉलिंगला मदत करतं असा इतिहास आहे. त्यामुळे या मॅचमध्ये भारतानं आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम हे तीन स्पिनर खेळवले आहेत. तर जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा हे दोन फास्ट बॉलर खेळवले आहेत.
(हे वाचा-IND vs ENG : ....म्हणून इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमसाठी ही सीरिज महत्त्वाची आहे. इंग्लंडला या स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी भारताला 3-0, 3-1 किंवा -0ने हरवावं लागेल. तर भारताला या स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी ही सीरिज 2 -0, 2-1, 3-0, 3-1 किंवा 4-0 या फरकानं जिंकावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket