Home /News /sport /

IND vs ENG: टीम इंडिया अडचणीत! 2 प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीचं विराटला टेन्शन

IND vs ENG: टीम इंडिया अडचणीत! 2 प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीचं विराटला टेन्शन

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट (India vs England 4th Test) जिंकत टीम इंडियानं या सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. आता पाचवी आणि शेवटची टेस्ट मँचेस्टरमध्ये 10 तारखेपासून खेळली जाणार आहे. या टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत भर पडली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट (India vs England 4th Test) जिंकत टीम इंडियानं या सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. टीम इंडिया 5 टेस्टच्या या सीरिजमध्ये 2-1 नं आघाडीवर आहे. आता पाचवी आणि शेवटची टेस्ट मँचेस्टरमध्ये 10 तारखेपासून खेळली जाणार आहे. या टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत भर पडली आहे. भारतीय टीममधील दोन प्रमुख खेळाडू सध्या जखमी असून त्यामुळे कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) टेन्शन वाढलं आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे दोन टीम इंडियाचे प्रमुख बॅट्समन सध्या दुखापतग्रस्त असून त्यांच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे. ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये या दोघांनीही दमदार खेळ केला आहे. रोहित शर्मानं 127 तर चेतेश्वर पुजारानं 61 रनची खेळी केली होती. या दोघांनी 153 रनच्या पार्टनरशिपमुळे टीम इंडियाला 466 रन करता आले होते. ओव्हल टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बॅटींग करताना पुजाराचा पाय दुखावला होता. त्यामुळे त्यानं पायाला पट्टी लावून बॅटींग केली. तसंच रोहितचा गुडघा देखील दुखावला आहे. आता पाचव्या दिवशी हे दोघं फिल्डिंगला उतरणार का? हे अजून स्पष्ट नाही. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. शिखर धवनसह 'या' 5 भारतीय क्रिकेटपटूंचा झाला आहे घटस्फोट पाचव्या टेस्टमध्ये ते मैदानात उतरले नाहीत तर तो टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. या दोघांच्या जागी मयांक अग्रवाल आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma

    पुढील बातम्या