Home /News /sport /

IND vs ENG: ...म्हणून मँचेस्टर टेस्ट रद्द झाली! सौरव गांगुलीचा खुलासा

IND vs ENG: ...म्हणून मँचेस्टर टेस्ट रद्द झाली! सौरव गांगुलीचा खुलासा

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) कोरोनामुळे रद्द करण्यात आली. या सर्व प्रकरणावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) कोरोनामुळे रद्द करण्यात आली. या टेस्टपूर्वी टीम इंडिया सीरिजमध्ये 2-1 नं आघाडीवर होती. आता सीरिजमधील शेवटची टेस्ट कधी होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. याबाबत भारत आणि इंग्लंड या दोन देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये चर्चा सुरु आहे. या सर्व प्रकरणावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'टेलिग्राफ'नं दिलेल्या बातमीनुसार भारतीय खेळाडूंनी पाचवी टेस्ट खेळण्यास नकार दिला होता, असं गांगुली यांनी सांगितले आहे. मात्र त्यानंतरही ही टेस्ट रद्द होण्यासाठी या खेळाडूंना जबाबदार धरण्यास त्यांनी नकार दिलाय. भारतीय खेळाडू हे फिजियो योगेश परमारच्या जवळ होते. ते त्यांच्याबरोबर सातत्यानं काम करत होते. परमार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं आढळल्यानंतर खेळाडू घाबरले होते. बायो-बबलमध्ये राहणे सोपे नाही, आपण त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असं गांगुली यांनी सांगितले आहे. रवी शास्त्रींना क्लीनचिट टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला कोरोनाचा मुख्य सोर्स मानला जात आहे. या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी मागण्यात आली नव्हती, असं गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुम्ही किती दिवस सर्वांना हॉटेलच्या रुममध्ये बंदिस्त ठेवणार? हे मानवी भूमिकेतून शक्य नाही. मी देखील तिथं शूटिंगसाठी गेलो होतो. त्या कार्यक्रमाला 100 जण उपस्थित होते. सर्वांनी लस घेतली होती. पण, दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत आहे, हे तुम्हाला माहिती नाही का? असा सवाल गांगुली यांनी यावेळी विचारला. IPL 2021: राजस्थानचा नवा खेळाडू फॉर्मात, 9 सिक्स लगावत दिला प्रतिस्पर्ध्यांना इशारा यापूर्वी बीसीसीआयनं ही टेस्ट मॅच रद्द केल्याचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले होते. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड सामंजस्याने रद्द झालेली ही टेस्ट मॅच भविष्यात वेळ असेल तेव्हा खेळवतील. यासाठी तारीख शोधली जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असं बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. तर इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) या टेस्टचं भवितव्य ठरवण्यासाठी आयसीसीकडं दाद मागितली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Sourav ganguly

    पुढील बातम्या