Home /News /sport /

IND vs ENG: इंग्लंडच्या खेळाडूचं मैदानात धक्कादायक वर्तन, विराटनं मागितली अंपायरकडं दाद VIDEO

IND vs ENG: इंग्लंडच्या खेळाडूचं मैदानात धक्कादायक वर्तन, विराटनं मागितली अंपायरकडं दाद VIDEO

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यावेळी इंग्लंडचा ओपनिंग बॅट्समन हसीब हमीदनं (Haseeb Hamid) केलेल्या वर्तनामुळे चांगलाच नाराज झाला होता. त्यानं या विषयावर अंपायरकडंही दाद मागितली.

    ओव्हल, 3 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England 4th Test) यांच्यातील चौथ्या टेस्टमध्ये पहिल्या दिवशी दोन्ही टीमनं जोरदार खेळ केला. इंग्लंडच्या बॉलिंगपुढे सुरुवातील भारतीय बॅटींग गडगडली. त्यानंतर शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) प्रतिहल्ला करत इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्ध शतक झळकावले. त्याच्या खेळामुळे टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 191 रन केले. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी जोरदार कामगिरी करत इंग्लंडच्या तीन विकेट्स झटपट घेतल्या. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यावेळी इंग्लंडचा ओपनिंग बॅट्समन हसीब हमीदनं (Haseeb Hamid) केलेल्या वर्तनामुळे चांगलाच नाराज झाला होता. हसीब बॅटींसाठी मैदानात आल्यावर त्यानं गार्ड घेताना पिचशी 'छेडछाड' केली. हमीदनं क्रिजच्या बाहेर गार्ड घेताना बुटाच्या साह्यानं पिच खराब केले. त्यामुळे विराटनं तातडीनं याला आक्षेप घेत अंपायरकडं दाद मागितली. नियम काय सांगतो? कोणताही बॅट्समन क्रिजवर येतो त्यावेळी तो बॅटींग करण्यापूर्वी पिचवर गार्ड घेतो. त्याला पिचवर ज्या ठिकाणी उभं राहयचं आहे, ती जागा तो बॅटनं मार्क करतो. त्यासाठी बॅट्समन कधी पायानं तर कधी बॅटनं त्या जागेवर मार्क बनवतो. असं असलं तरी बॅट्समनला पिचवरील कोणत्याही जागी गार्ड घेण्यास मनाई आहे. आयसीसीच्या नियमानुसार क्रिजपासून 5 फूटापेक्षा जास्त दूर बॅट्समनला गार्ड घेता येत नाही. त्याला धोकादायक क्षेत्र असं मानलं जातं. त्या ठिकाणी धावण्यास बॅट्समनला मनाई असते. हसीब हमीद याच जागी पायानं पिच खोदत होता. त्याचे हे वर्तन विराटला आवडले नाही. त्यामुळे त्यानं तातडीनं अंपायरकडं याची तक्रार केली. आयसीसीच्या नियमानुसार पिच खराब केल्यानंतर अंपायर बॅट्समनला पहिल्यांदा इशारा देतात. त्यानंतरही त्यानं ही चूक केल्यानंतर बॅट्समनच्या खात्यामधील 5 रन कमी केले जातात. IND vs AUS : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात त्रस्त, क्वारंटाईन सेंटरमध्ये खेळाडूंचे हाल! या सर्व धडपडीनंतरही हमीद शुक्रवारी अपयशीच ठरला. तो 12 बॉल खेळून एकही रन न काढता आऊट झाला. जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) त्याला आऊट केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या