• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : भर मैदानात भिडले विराट कोहली आणि बेन स्टोक्स! पाहा VIDEO

IND vs ENG : भर मैदानात भिडले विराट कोहली आणि बेन स्टोक्स! पाहा VIDEO

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चौथी आणि शेवटची टेस्ट सुरू आहे. या टेस्टमध्ये भर मैदानात विराट कोहली (Virat Kohli) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) हे परस्परांना भिडले होते.

 • Share this:
  अहमदाबाद, 04 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथी आणि शेवटची टेस्ट अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरू आहे. या मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील आव्हान (WTC) संपुष्टात आले आहे. आता चौथी टेस्ट जिंकून किमान मालिकेतील पराभव टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. अक्षर पटेलनं (Axar Patel) 2 तर मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) 1 विकेट घेत इंग्लंडला तीन झटपट धक्के दिले. जसप्रीत बुमराहनं वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्यानं सिराजचा या टेस्टसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सिराजनं या संधीचा चांगलाच फायदा उठवला. त्यानं इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) याला अगदी स्वस्तामध्ये आऊट केलं. रुट आऊट झाल्यानंतर बेन स्टोक्स (Ben Stokes) बॅटींगला आला. इंग्लंडच्या या ऑल राऊंडरला मागील दोन टेस्टमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. (हे वाचा-IND vs ENG: घरच्या मैदानावर अक्षरचा कहर, सलग तिसऱ्या इनिंगमध्ये केला पराक्रम) स्टोक्स चौथ्या टेस्टमध्ये हे अपयश विसरुन बॅटींग करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला सिराजनं डिवचलं. सिराजनं स्टोक्सला बाऊंसर टाकला आणि दोघांमध्ये काही तरी शाब्दिक संभाषण सुरु झालं. हे संभाषण वेगळं वळण घेत आहे हे लक्षात येताच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सिराजच्या बाजूनं धावला. विराट स्टोक्सला उद्देशून काही तरी बोलला. त्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. हा तणाव आणखी वाढण्यापूर्वी मैदानातील अंपायरनं हस्तक्षेप करत दोन्ही खेळाडूंना एकमेकांपासून दूर केलं. What’s going on here lads? #INDvENG pic.twitter.com/lThox51Pp4 — Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) March 4, 2021 (हे वाचा : हिरो ते झिरो! फक्त 12 बॉलमध्ये बदललं श्रीलंकेच्या बॉलरचं नशिब ) बेन स्टोक्सनं पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजला तीन फोर लगावत उत्तर दिलं. सिराजनं लंचनंतर लगेच स्टोक्सचा जोडीदार जॉनी बेअरस्टोला आऊट करत इंग्लंडला चौथा धक्का दिला.
  Published by:News18 Desk
  First published: