मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: उमेश यादवनं उखाडलं इंग्लंडचं 'मूळ' चौथ्या टेस्टमध्ये रंगत, VIDEO

IND vs ENG: उमेश यादवनं उखाडलं इंग्लंडचं 'मूळ' चौथ्या टेस्टमध्ये रंगत, VIDEO

टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमेश यादवनं (Umesh Yadav) 9 महिन्यांतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केलं आहे. उमेशनं पहिल्याच दिवशी त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला.

  • Published by:  News18 Desk

ओव्हल, 3 ऑगस्ट: टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमेश यादवनं (Umesh Yadav) 9 महिन्यांतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केलं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमधील चौथी टेस्ट सध्या ओव्हलवर (India vs England 4th Test) सुरू आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच उमेशचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. उमेशनं पहिल्याच दिवशी त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला.

उमेशनं ओव्हल टेस्टच्या पहिल्या दिवशी या सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जो रूटला (Joe Root) आऊट केलं. रूटनं पहिल्या तीन्ही टेस्टमध्ये सेंच्युरी लगावली आहे. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला रूट हा इंग्लंडच्या बॅटींगचा कणा आहे. त्याला उमेशनं आऊट करत टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. रूटनं 21 रन केले.

उमेश यादवच्या पूर्वी जसप्रीतच बुमराहनं देखील जोरदार बॉलिंग केली. त्यानं एकाच ओव्हरमध्ये रोरी बर्न्स आणि हसीब अहमद यांना आऊट केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचे 3 आऊट 55 रन झाले होते. डेव्हिड मलान (David Malan) 26 रनवर आणि क्रेग ओव्हरटन 1 रनवर खेळत आहे.  टीम इंडियाकडं अजूनही 138 रनची आघाडी आहे.

यापूर्वी टीम इंडियाची पहिली इनिंग 191 रनवरच संपुष्टात आली. इंग्लंडच्या बॉलिंग समोर भारतीय बॅटींग ऑर्डर पुन्हा एकदा गडगडली. शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) फटकेबाजीमुळे भारताला 191 पर्यंत मजल मारता आली. . शार्दुलने 36 बॉलमध्ये 57 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. शार्दुल ठाकूरने उमेश यादवसोबत आठव्या विकेटसाठी 63 रनची पार्टनरशीप केली.

IND vs ENG: तुला मानला रे ठाकूर! इंग्लंडमध्ये केला सर्वात मोठा रेकॉर्ड

5 टेस्ट मॅचची ही सीरिज सध्या 1-1 नं बरोबरीत आहे. ट्रेन्ट ब्रीजची पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर इंग्लंडच्या टीमने धडाकेबाज पुनरागमन करत लीड्सवर झालेली तिसरी टेस्ट इनिंग आणि 76 रनने जिंकली.

First published:

Tags: Cricket news, India vs england