Home /News /sport /

IND vs ENG : सचिन-सेहवाग नाही तर शतकांच्या 'या' विक्रमामध्ये रोहित आहे नंबर 1

IND vs ENG : सचिन-सेहवाग नाही तर शतकांच्या 'या' विक्रमामध्ये रोहित आहे नंबर 1

रोहित शर्मानं (Rohit Sharma) विदेशामध्ये टेस्ट क्रिकेटमधील पहिलं शतक हे सिक्स लगावत पूर्ण केलं. त्यानं 95 रनवर असताना मोईन अलीला सिक्स लगावला. या शतकानंतर सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) चर्चा होती.

    ओव्हल, 5 सप्टेंबर : ओव्हल टेस्टच्या  (India vs England, 4th Test) तिसऱ्या दिवशी टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं. या दिवसाच्या अखेरीस भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 3 आऊट 270 पर्यंत मजल मारली आहे. टीम इंडियाची पहिली इनिंग 191 रनवर संपुष्टात आली होती. त्यानंतर ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मानं  (Rohit Sharma) झळकावलेल्या शतकामुळे टीम इंडियानं मॅचमध्ये पुनरागमन केले आहे. रोहित शर्मानं विदेशामध्ये टेस्ट क्रिकेटमधील पहिलं शतक हे सिक्स लगावत पूर्ण केलं. त्यानं 95 रनवर असताना मोईन अलीला सिक्स लगावला. या शतकानंतर सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) चर्चा होती. क्रिकेट फॅन्सनी त्याची तुलना सेहवागशी केली. सेहवागच्या स्टाईलनं रोहितनं शतक पूर्ण केलं असंच सर्वांचं मत होतं. पण, प्रत्यक्षात याबाबतीमध्ये रोहित सेहवागपेक्षा बराच पुढं आहे. रोहित शर्मानं सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 10 वेळा शतक आणि द्विशतक सिक्स लगावत पूर्ण केलं आहे. कोणताही भारतीय बॅट्समन त्याच्या जवळपास नाही. सचिननं 6 वेळा ही कामगिरी केलीय. पण त्याने ही सर्व शतकं टेस्ट क्रिकेटमध्ये झळकावली आहेत. सेहवागनं त्रिशतक सिक्स लगावत पूर्ण केलंय. टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर रोहितनं तीन वेळा सिक्स लगावत शतक झळकावलं आहे. तर गौतम गंभीर आणि ऋषभ पंतनं ही कामगिरी प्रत्येकी 2 वेळा केली आहे. Tokyo Paralympics : नोएडाच्या DM ची ऐतिहासिक कामगिरी, पॅरालिम्पिकमध्ये पटकावले सिल्व्हर द्रविडला टाकलं मागे रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. रोहितच्या नावावर इंग्लंडमध्ये 9 शतकं आहेत. याआधी राहुल द्रविडच्या नावावर इंग्लंडमध्ये 8 शतकं होती. रोहितने इंग्लंडमध्ये 9 शतकं करण्याच्या व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रिचर्ड्स यांच्या नावावर वनडे आणि टेस्टमध्ये इंग्लंडमध्ये 9 शतकं आहेत. आता रोहितच्या पुढे फक्त डॉन ब्रॅडमन आहेत, ज्यांनी इंग्लंडमध्ये 11 शतकं केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma

    पुढील बातम्या