Home /News /sport /

IND vs ENG: ऐतिहासिक शतकानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

IND vs ENG: ऐतिहासिक शतकानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्माने शतक झळकावले आहे. विदेशात टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितचे हे पहिलेच शतक आहे.

    ओव्हल, 5 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्माने शतक झळकावले आहे. विदेशात टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितचे हे पहिलेच शतक आहे. या शतकासाठी रोहित शर्माला आठ वर्ष प्रतीक्षा करावी लागली आहे. रोहित  2019 साली टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा ओपनिंगला आला होता. त्यानंतर त्यानं या प्रकारातही सातत्यानं चांगला खेळ केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनिंगला येणे हा आपल्या आयुष्यातील मोठ्या निर्णयापैकी एक होता. ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे, याची जाणीव आपल्याला होती, याची कबुली रोहितनं दिली आहे. रोहितचं हे टेस्ट क्रिकेटमधील आठवं आणि भारताबाहेरचं पहिलंच शतक आहे. ओव्हल टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया पिछाडीवर होती. त्यानंतर रोहितनं परिस्थितीचं भान राखत हे शतक झळकावलं. रोहितनं या शतकानंतर बोलताना साांगितले की, 'मी यापूर्वी मिडल ऑर्डरमध्ये बॅटींग केली होती. त्यामध्ये मी अपेक्षेप्रमाणे यशस्वी झालो नाही. कोणताही खेळ खेळत असताना त्यामध्ये चान्स घेणे आवश्यक असते. टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनिंगला येणे ही माझ्यासाठी शेवटची संधी होती. मी यामध्ये यशस्वी झालो नसतो, तर काहीही होऊ शकले असते.' असे रोहितने स्पष्ट केले. IND vs ENG: पुजाराच्या संयमी बॅटींगनं इंग्लंड संतप्त! लाजीरवाण्या घटनेचा VIDEO VIRAL रोहित शर्माने त्याच्या या शतकी खेळीवेळीच टेस्ट क्रिकेटमधले आपले 3 हजार रनही पूर्ण केले. त्याआधी ओव्हल टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहित शर्माचे ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार रन पूर्ण झाले. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीयांनाच हा विक्रम करता आला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma

    पुढील बातम्या