मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: विराटनं पुन्हा ठेवलं अश्विनला बाहेर, पत्नी प्रितीनं VIDEO मधून व्यक्त केली नाराजी

IND vs ENG: विराटनं पुन्हा ठेवलं अश्विनला बाहेर, पत्नी प्रितीनं VIDEO मधून व्यक्त केली नाराजी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) विराट कोहलीनं (Virat Kohli)  आर. अश्विनला (R. Ashwin) पुन्हा एकदा बाहेर ठेवले. या निर्णयावर अश्विनची पत्नी प्रिती नारायण (Preethi Narayanan) हिनं सूचक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

ओव्हल, 3 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वांचेच अंदाज चुकवत आर. अश्विनला (R. Ashwin) बाहेर ठेवले. अश्विनला या सीरिजमध्ये एकदाही प्लेईंग 11 (Playing 11) संधी मिळालेली नाही. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णायवर अश्विनची पत्नी प्रिती नारायण (Preethi Narayanan) हिनं सूचक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

प्रिती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तसेच ती स्पष्ट विचार मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. यावेळी देखील तिनं या निर्णायावर नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे. प्रितीनं तिची मुलगी दुर्बिनीतून मॅच पाहत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमधून तिनं ही नाराजी व्यक्त केली आहे. 'रविचंद्रन अश्विनला पाहत आहे.' असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे. या मोजक्या शब्दातूनच तिनं या निर्णयावर सूचक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

अश्विनऐवजी रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) का संधी दिली जात आहे, असा प्रश्न विराट कोहलीला टॉसवेळी विचारण्यात आला. त्यावेळी विराटने दिलेल्या उत्तराने अनेकांना धक्का बसला. इंग्लंडच्या टीममध्ये 4 डावखुरे बॅट्समन आहेत, त्यामुळे ऑफ स्टम्पबाहेरच्या फूटमार्कचा वापर जडेजा चांगल्या पद्धतीने करू शकतो, असा दावा विराट कोहलीने केला.

IND vs ENG: गुडघ्यातून रक्त येत असतानाही अँडरसन खेळत होता, पाहा VIDEO

डावखुऱ्या बॅट्समनसमोर ऑफ स्पिनरची बॉलिंग जास्त परिणामकारक असते. तसंच डावखुरे बॅट्समनना डावखुऱ्या बॉलरना खेळणं सोपं जातं, हे क्रिकेटचा इतिहास सांगतो, त्यामुळे विराटच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

First published:

Tags: Cricket news, India vs england, R ashwin