मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : ओव्हल टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहनं केला नकोसा रेकॉर्ड

IND vs ENG : ओव्हल टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहनं केला नकोसा रेकॉर्ड

 क्रिकेट विश्वात अनेकदा खेळाडूंच्या नावावर त्यांना नको असलेल्या रेकॉर्डची नोंद होती. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) जसप्रीत बुमराहच्या बाबतीत हेच घडलं.

  • Published by:  News18 Desk

ओव्हल, 3 सप्टेंबर : क्रिकेट विश्वात अनेकदा खेळाडूंच्या नावावर त्यांना नको असलेल्या रेकॉर्डची नोंद होती. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) जसप्रीत बुमराहच्या बाबतीत हेच घडलं. टीम इंडियाच्या इनिंगमध्ये बुमराह (Jasprit Bumrah) दहाव्या क्रमांकावर बॅटींगला आला. त्यानंतर तो लगेच शून्यावर आऊट झाला.

बुमराह शून्यावर आऊट होण्याची या वर्षातील ही सातवी वेळ आहे. त्याचबरोबर बुमराहनं आता एका वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याच्या बाबतीत (Most Duck) बिशनसिंग बेदी  (Bishan Singh Bedi) यांची बरोबरी केली आहे. बुमराहची ही 14 वी टेस्ट मॅच आहे. यामध्ये बुमराह 14 वेळा शून्यावर आऊट झालाय. विशेष म्हणजे 14 पैकी 7 वेळा तो 2021 साली शून्यावर परतला आहे.

बुमराहनंतर इंग्लंडचा ओपनिंग बॅट्समन रॉरी बर्न्सचा (Rory Burns) क्रमांक आहे. तो या वर्षात 5 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. बुमराह आणि बर्न्स एकावेळी बरोबरीत होते. आता बुमराह त्याच्या पुढे गेला आहे.

T20 वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमनं टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला...

एका वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मर्वन डिल्लनच्या  (Mervyn Dillon) नावावर आहे. वेस्ट इंडिजचा हा क्रिकेटपटू 2002 साली 11 टेस्टमध्ये 10 वेळा शून्यावर आऊट झाला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बुमराह आणि बिशनसिंग बेदी यांच्यासह 8 खेळाडू आहेत. यामध्ये मिचेल जॉन्सन, कर्टनी वॉल्श, जेरोन टेलर, नुआन प्रदीप, वेन क्लार्क आणि एलन हस्ट यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Jasprit bumrah