मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: गुडघ्यातून रक्त येत असतानाही अँडरसन खेळत होता, पाहा VIDEO

IND vs ENG: गुडघ्यातून रक्त येत असतानाही अँडरसन खेळत होता, पाहा VIDEO

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट (India vs England 4th Test) गुरुवारी सुरु झाली. . यावेळी इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) यानं जखमी झाल्यानंतर बॉलिंग केली. अँडरसनच्या या जिगरबाज वृत्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

ओव्हल, 3 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट (India vs England 4th Test) गुरुवारी सुरु झाली. या टेस्टमध्ये पहिल्या दिवशी बॉलर्सचं वर्चस्व होतं. दिवसभरात एकूण 13 विकेट्स पडल्या. यावेळी इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) यानं जखमी झाल्यानंतर बॉलिंग केली. अँडरसनच्या या जिगरबाज वृत्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

भारतीय इनिंगच्या 40 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना अँडरसन पिचवर पडला. त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली तसंच त्यामधून रक्त येऊ लागलं. तरीही त्यानं फिजिओला मैदानात बोलवलं नाही आणि ओव्हर पूर्ण केली. या कणखरपणाबद्दल फॅन्सनी अँडरसनला सलाम केला आहे. अँडरसननं या इनिंगमध्ये एक विकेटही घेतली.

पाच टेस्टची ही सीरिज सध्या 1-1 नं बरोबरीत आहे. ओव्हल टेस्ट जिंकणारी टीम ही सीरिज गमावणार नाही. त्यामुळे ही टेस्ट दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंड आणखी 138 रननं पिछाडीवर असून त्यांच्या 7 विकेट्स बाकी आहेत.

टीम इंडियाकडून कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांनी अर्धशतक झळकावले.या दोघांचा अपवाद वगळता एकालाही चांगली खेळी करता न आल्यानं भारताची पहिली इनिंग 191 रनवरच संपुष्टात आली. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर ओली रॉबिनसनला 3 विकेट मिळाल्या. जेम्स अंडरसन आणि क्रेग ओव्हरटनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

Tokyo Paralympics : प्रवीण कुमारची ऐतिहासिक उडी, भारताची आणखी एका मेडलची कमाई

 ट्रेन्ट ब्रीजची पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर इंग्लंडच्या टीमने धडाकेबाज पुनरागमन करत लीड्सवर झालेली तिसरी टेस्ट चौथ्या दिवशीच जिंकत बरोबरी साधली.

First published:

Tags: Cricket news, India vs england