ओव्हल, 6 सप्टेंबर : टीम इंडिया ओव्हल टेस्टच्या (India vs England 4th Test) चौथ्या दिवशी प्रचंड टेन्शनमध्ये होती. बॅटींग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी याचा खुलासा केला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच हेड कोच रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात असलेले बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun), फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R Sridhar) आणि फिजिओ नितीन पटेल (Nitin Patel) यांनाही हॉटेलमध्ये आयसोलेट करण्यात आले आहे.
राठोड यांनी चौथ्या दिवशी खेळ संपल्यावर सांगितलं की, 'आम्हाला नक्कीच त्यांची कमतरता जाणवली आहे. रवी भाई (रवी शास्त्री) भरत अरुण आणि आर. श्रीधर हे बराच काळापासून टीमचे सदस्य आहे. गेली 5-6 वर्ष त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीमनं चांगली कामगिरी केली आहे. मॅच सुरु होण्यापूर्वी खेळाडूंना विचलित करणारी ती बातमी आहे. त्यावेळी ज्या गोष्टी आमच्या हातात आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
आम्ही खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. ही एक महत्त्वाची सीरिज आहे. त्यामुळे आम्ही फक्त खेळावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे चौथ्या दिवशी टीम इंडिया चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झाली, असे राठोड यांनी सांगितले.
शनिवारी संध्याकाळी रवी शास्त्रींना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. याशिवाय शास्त्रींच्या संपर्कात आलेले बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun), फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) आणि फिजियोथेरपिस्ट नितीन पटेल (Nitin Patel) देखील आयसोलेशनमध्ये गेले आहेत.
T20 World Cup 2021: पाकिस्तानची टीम जाहीर, 2 सुपर फ्लॉप खेळाडूंचा समावेश
टीमच्या इतर सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या टेस्टच्या चौथ्या दिवसाचा खेळ झाला. रवी शास्त्री यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले असून तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.