अहमदाबाद, 18 मार्च : टीम इंडियासाठी
(Team India) गुरुवारी होणारी चौथी टी20 मॅच ही 'करो या मरो' या स्वरुपाची आहे. भारतीय टीम इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत
(India vs England T20 series) 1-2 ने पिछाडीवर आहे. आता आणखी एक पराभव झाल्यास भारत ही मालिका गमावेल. त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये चौथी मॅच जिंकावी लागेल. त्यामुळे भारतीय टीम या मॅचमध्ये कोणत्या प्लेयिंग इलेव्हन
(Playing 11) सह मैदानात उतरेल हा प्रश्न आहे. मागील 3 टी 20 मॅचमध्ये भारतीय टीमनं केलेल्या बदलामुळे अनेक क्रिकेट तज्ज्ञांना धक्का बसला आहे. त्यामुळे चौथ्या मॅचमध्ये कोणते 11 खेळाडू टीम इंडियाकडून खेळतील हे सांगणे अवघड आहे.
चौथ्या टी20 मॅचसाठी टीमची निवड करताना मागील तीन मॅचच्या कामगिरीचा विचार केला जाऊ शकतो. केएल राहुल
(KL Rahul) सध्या खराब फॉर्मात आहे. त्याने या मालिकेतील 3 मॅचमध्ये फक्त 1 रन केले आहे. त्यामुळे राहुलच्या जागेवर सूर्यकुमार यादव
(Suryakumar Yadav) याला संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारनं दुसऱ्या टी20 मध्ये पदार्पण केलं. मात्र त्याला बॅटींगची संधी मिळालेली नसताना तिसऱ्या टी20 मधून वगळण्यात आले होते.
(हे वाचा-Road Safety World Series 2021: भारताचा फायनलमध्ये प्रवेश, सचिन-युवराजचा धमाका)
टीम इंडियासाठी केएल राहुलच्या जागेवर इशान किशन ओपनिंगला येईल अशी देखील शक्यता आहे. रोहित शर्मा त्याचा पार्टरनर असेल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा विराट कोहली खेळेल. विराटनंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर खेळणार हे नक्की आहे. सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. त्यानंतर हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर यांचा नंबर असेल.
भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांचा देखील टीममधील समावेश नक्की मानला जात आहे. चहलची या मालिकेतील कामगिरी साधारण आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर अक्षर पटेलला संधी मिळाली तर भारताची बॉलिंग आणखी मजबूत होऊ शकते.
(हे वाचा : On This Day : दिनेश कार्तिकचा शेवटच्या बॉलवर सिक्स आणि टीम इंडियाला विजेतेपद! )
भारताची संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.