• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG: टीम इंडियानं 'हे' काम केलं तर इंग्लंडचा पराभव निश्चित!

IND vs ENG: टीम इंडियानं 'हे' काम केलं तर इंग्लंडचा पराभव निश्चित!

हेडिंग्ले टेस्टमध्ये टीम इंडियाचा संघर्ष (India vs England 3rd Test) सुरु आहे. भारतीय टीम अजूनही 139 रनननं पिछाडीवर आहे. हेंडिग्ले टेस्ट जिंकणे टीम इंडियाला अवघड असले तरी अशक्य अजिबात नाही.

 • Share this:
  हेडिंग्ले, 28 ऑगस्ट: हेडिंग्ले टेस्टमध्ये टीम इंडियाचा संघर्ष (India vs England 3rd Test) सुरु आहे. पहिल्या इनिंगमध्ये 354 रनच्या पिछाडीनंतर टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 2 आऊट 215 रन केले आहेत. भारतीय टीम अजूनही 139 रनननं पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 91 तर कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) 45 रन काढून खेळत आहेत. या पिचवर इंग्लंडला किती रनचं लक्ष्य द्यावं हा विचार टीम इंडियाचं मॅनेजमेंट करत असेल. लॉर्ड्सवरील दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या टीमला फक्त 120 रनच करता आले होते. 5 टेस्टच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या 1-0 नं आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ हेंडिग्ले टेस्ट जिंकणे टीम इंडियाला अवघड असले तरी अशक्य अजिबात नाही. हेडिंग्लेचा रेकॉर्ड पाहिला तर इंग्लंडनं चौथ्या इनिंगमध्ये 12 वेळा 200 पेक्षा जास्त रन केले आहेत. यापैकी 7 वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला असून 3 टेस्ट मॅच त्यांनी जिंकल्या आहेत. तर दो ड्रॉ झाल्या आहेत. या परिस्थितीमध्ये टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी किमान 200 रनची आघाडी आवश्यक आहे. हेडिंग्लेमध्ये यापूर्वी टीम इंडियानं इंग्लंडला 150 पेक्षा कमी रनमध्ये ऑल आऊट केलं आहे. 1986 साली झालेल्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच जिंकण्यासाठी चौथ्या इनिंगमध्ये 408 रनचं लक्ष्य होतं. त्यावेळी इंग्लंडची टीम 128 रनवर आऊट झाली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये मनिंदर सिंगनं 26 रन देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसंच रवी शास्त्रीनीही एक विकेट घेतली होती. या टीममध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा स्पिनर आहे. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या. आता दुसऱ्या इनिंगमध्येही तो निर्णायक ठरु शकतो. IND vs ENG: ऋषभ पंतबरोबर अंपायरचा पक्षपात! संतप्त सुनील गावसकरांनी ऐकवले नियम इंग्लंडची यावर्षी कामगिरी निराशाजनक इंग्लंडसाठी 2021 हे वर्ष निराशाजनक ठरलं. त्यांची टीम दोन वेळा चौथ्या इनिंगमध्ये 200 पेक्षा कमी रन काढून आऊट झाली आहे. लॉर्ड्सपूर्वी चेन्नई टेस्टमध्येही इंग्लंडची ही अवस्था झाली होती. त्यामुळे टीम इंडियाला इंग्लंडवर चांगली आघाडी घेत हेंडिग्ले टेस्ट जिंकण्याची संधी आहे.
  Published by:News18 Desk
  First published: