मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: ऋषभ पंतबरोबर अंपायरचा पक्षपात! संतप्त सुनील गावसकरांनी ऐकवले नियम

IND vs ENG: ऋषभ पंतबरोबर अंपायरचा पक्षपात! संतप्त सुनील गावसकरांनी ऐकवले नियम

टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी हेडिंग्ले टेस्टमधील अंपयायरच्या आक्षेपांवर नाराजी व्यक्त केली आहे.

टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी हेडिंग्ले टेस्टमधील अंपयायरच्या आक्षेपांवर नाराजी व्यक्त केली आहे.

टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी हेडिंग्ले टेस्टमधील अंपयायरच्या आक्षेपांवर नाराजी व्यक्त केली आहे.

  • Published by:  News18 Desk

हेडिंग्ले, 28 ऑगस्ट: टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी हेडिंग्ले टेस्टमधील अंपयायरच्या आक्षेपांवर नाराजी व्यक्त केली आहे. टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) बॅटींग करत असताना अंपयारनं आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपांना गावसकरांनी नियमांचा आधार घेत उत्तर दिलं आहे.

काय घडला प्रकार?

ऋषभ पंत बॅटींगला आला त्यावेळी त्याच्या स्टान्सवर अंपायरनं आक्षेप घेतला होता. पंत क्रिजच्या बाहेर उभा असल्यानं मैदानातील धोकादायक भागात पायाचे ठसे उमटत आहेत. त्यामुळे बॅटींगचा स्टान्स बदलावा, अशी सूचना अंपायरनं केली होती. त्या सूचनेनंतर आपण स्टान्स बदलला असं पंतनं सांगितलं होतं.

हेडिंग्ले टेस्टच्या तिसऱ्या दिवशी कॉमेंट्री करताना गावसकर म्हणाले की, ' हे खरं असेल तर त्याला स्टान्स बदलण्यास अंपायरनं का सांगितलं असावं ? याचा मी विचार करत आहे. बॅट्समन पिचवर कुठंही उभा राहू शकतो. अगदी पिचच्या मध्यभागीही त्याला उभं राहता येतं. बॅट्समन अनेकदा स्पिन बॉलर्सला पुढं येऊन खेळतात. त्यावेळी देखील पिचवर त्यांच्या पायांचे ठसे उमटतात.

हेडिंग्ले टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया 78 रनवर ऑल आऊट झाली. पंतनं त्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला होता. 'मी क्रिजच्या बाहेर उभा होतो. माझा पुढचा पाय 'धोकादायक भागात' येत होता. त्यावेळी त्यांनी (अंपायर) मला इथं उभारता येणार नाही, असं सांगितलं. त्यामळे मला स्टान्स बदलावा लागला. एक क्रिकेटपटू म्हणून मी यााबाबत विचार करत नाही. कारण, जो कुणी असं करेल त्यालाही अंपायर  हीच सूचना करतील. अंपायरच्या या सूचनेनंतर पुढच्या बॉलवर मी तसं केलं नाही.'

CPL मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! सलग 2 बॉलवर कॅच घेतल्यानंतरही पोलार्ड Not Out

 या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं (ICC)  तटस्थ अंपायरची नेमणूक करावी का? ही चर्चा सुरू झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे आलेल्या प्रवाशाच्या निर्बंधामुळे आयसीसीनं स्थानिक अंपायरची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Rishabh pant