मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: चेतेश्वर पुजाराच्या टीकाकारांना रोहित शर्माचं चोख उत्तर , म्हणाला...

IND vs ENG: चेतेश्वर पुजाराच्या टीकाकारांना रोहित शर्माचं चोख उत्तर , म्हणाला...

लीड्स टेस्टपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) फॉर्मवर सातत्यानं टीका होत होती. त्यानं झुंजार खेळी करत स्वत:ला सिद्ध केले. पुजाराच्या या इनिंगनंतर रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्याची टीममधील गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

हेडिंग्ले, 28 ऑगस्ट: हेडिंग्ले टेस्टच्या तिसऱ्या दिवशी (India vs England, 3rd Test)  टीम इंडियानं जोरदार पुनरागमन करत मॅचमधील आव्हान कायम ठेवलं आहे. इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 354 रनची आघाडी मिळवली आहे. त्याला उत्तर देताना टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाच्याअखेरीस 2 आऊट 215 रन केले आहेत. शुक्रवारचा खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा  (Cheteshwar Pujara) 91 तर कॅप्टन विराट कोहली 45 रनवर नाबाद आहे. टीम इंडिया अजूनही 139 रननं पिछाडीवर आहे.

या मॅचपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या फॉर्मवर सातत्यानं टीका होत होती. त्यानं झुंजार खेळी करत स्वत:ला सिद्ध केले. पुजाराच्या या इनिंगनंतर रोहित शर्मानं त्याची टीममधील गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. रोहितनं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर सांगितलं की, 'टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुममध्ये पुजाराच्या फॉर्मवर कधीही चर्चा झाली नाही. त्याचा फॉर्म बाहेरुन हरवला होता. पण तो मानसिक रित्या फॉर्ममध्ये होता. लोकांची स्मरणशक्ती थोडी कमकुवत आहे. पुजारानं मागील काही वर्षांमध्ये टीम इंडियासाठी काय-काय केलं त्याचा विचार करण्याची गरज आहे.'  या शब्दात रोहितनं पुजाराच्या टीकाकारांना सुनावलं आहे.

टीम इंडियाच्या रणनीतीचा खुलासा

रोहित शर्मानं यावेळी लीड्स टेस्टमधील टीम इंडियाच्या रणनीतीचा खुलासा केला. 'आमची टीममध्ये मॅचमध्ये कोणत्याही प्रकारे कायम राहावे म्हणून खेळत नाही. तर जास्तीत जास्त रन करणे हा आमचा उद्देश आहेत. आम्ही रन काढण्यासाठी खेळत आहोत. पुजारा देखील याच निर्धारानं मैदानात उतरला आहे. मागील काही इनिंगमध्ये पुजारानं रन केले नाहीत, याचा अर्थ त्याच्यातील गुणवत्ता संपली असा होता नाही.'

Tokyo Paralympics मधून सकाळी सकाळी गोड बातमी; भाविना पटेल गोल्ड मेडलपासून अवघं एक पाऊल दूर

5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. ट्रेन्ट ब्रीजमध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Pujara, Rohit sharma