मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: 'हे लीड्स आहे...कोलकाता नाही! इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा टीम इंडियाला इशारा

IND vs ENG: 'हे लीड्स आहे...कोलकाता नाही! इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा टीम इंडियाला इशारा

हेडिंग्ले टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस (India vs England 3rd Test) टीम इंडिया 139 रननं मागे आहे. या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसेननं (Nasser Hussain) टीम इंडियाला इशारा दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

हेडिंग्ले, 28 ऑगस्ट: हेंडिग्लेमधील लीड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये (India vs England, 3rd Test) टीम इंडियानं पुनरागमन केले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 आऊट 215 रन केले आहेत. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 91 तर कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) 45 रनवर नॉट आऊट आहेत.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडिया 139 रननं मागे आहे. या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसेननं टीम इंडियाला इशारा दिला आहे. 'तिसऱ्या दिवशी चांगला खेळ केल्यानंतरही टीम इंडियाला विजयासाठी आणखी भरपूर कष्ट करावे लागतील. ही कोलकाता टेस्ट नाही, जी टीम इंडिया जिंकू शकेल.' असं हुसेननं म्हंटलं आहे. 2001 साली कोलकातामध्ये झालेल्या टेस्टमध्ये फॉलो ऑन स्विकारल्यानंतरही टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

नासीर हुसेननं मॅच संपल्यानंतर सोनी स्पोर्ट्सवर बोलताना सांगितलं की, ' भारताला लीड्स टेस्ट वाचवण्यासाठी चौथ्या दिवशी खूप चांगली बॅटींग करायला हवी. टीम इंडियाला ही मॅच जिंकण्यासाठी किमान 150 रनची आघाडी घ्यावी लागेल. हे सोपनं नाही. लक्षात ठेवा हे कोलकाता नाही, जिथं पाचव्या दिवशी बॉल वळू लागेल. हे लीड्सचं पिच आहे. जे बॅटींगसाठी वरचेवर चांगलं होईल. त्यामुळे इथं  इंग्लडला हरवण्यासाठी खूप चांगली बॅटींग आणि बॉलिंग करावी लागेल.

IND vs ENG: मोठी बातमी! इंग्लंडच्या फास्ट बॉलरला कोरोना

हुसेन यांनी यावेळी टीम इंडिायाच्या कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीचीही प्रशंसा  केली आहे. 'टीम इंडिया कधीही हार न मानणारी टीम आहे. त्यांनी तिसऱ्या दिवशीही तेच केले. रोहित शर्मा इंग्लडमध्ये बॅटींग करु शकणार नाही, असे अनेक जण म्हणत होते. पण त्याने हे खोटं ठरवलं आहे.

चेतेश्वर पुजारावर मोठा दबाव होता. पण, त्यानं सर्वात आवश्यक वेळी रन काढले आहेत. मी त्याच्याबद्दल खूप आनंदी आहे. विराट कोहलीलाही मोठी खेळी करण्यात अपयश येत होते. पण त्यानं चांगली बॅटींग केली. टीम इंडियाला ही मॅतच जिंकण्यासाठी आणखी खूप जबरदस्त खेळ केला पाहिजे.' असं हुसेननं स्पष्ट केलं.

First published:

Tags: Cricket news, India vs england