मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराट कोहलीनं सुधारली चूक, मोहम्मद सिराजच्या मागणीवर घेतला 'हा' निर्णय

IND vs ENG : विराट कोहलीनं सुधारली चूक, मोहम्मद सिराजच्या मागणीवर घेतला 'हा' निर्णय

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) अनेकदा चुकीचा रिव्यू घेतल्याबद्दल टिका सहन करावी लागली आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) अनेकदा चुकीचा रिव्यू घेतल्याबद्दल टिका सहन करावी लागली आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) अनेकदा चुकीचा रिव्यू घेतल्याबद्दल टिका सहन करावी लागली आहे.

    लॉर्ड्स, 15 ऑगस्ट : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) अनेकदा चुकीचा रिव्यू घेतल्याबद्दल टिका सहन करावी लागली आहे. लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या दिवशी त्यानं ऋषभ पंतनं (Rishabh Pant) नकार दिल्यानंतरही मोहम्मद सिराजच्या मागणीवर (Mohammed Siraj) रिव्यू घेतला होता. मात्र तिसऱ्या दिवशी विराटनं ही चूक सुधारत अधिक सतर्कता दाखवली. मोहम्मद सिराजनं विराटला एकाच ओव्हरमध्ये तीनदा रिव्यू घेण्याची मागणी केली. मात्र विराटनं त्याला नकार दिला. यापूर्वी लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या दिवशी सिराजचा स्विंग बॉल जो रूटच्या (Joe Root) पॅडला लागला होता. त्यानंतर सिराजच्या आग्रहामुळे विराटनं रिव्यू घेतला होता. त्यावेळी टीम इंडियाला निराशा सहन करावी लागली होती. पंतनं दिला होता नकार मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवरच पुन्हा एकदा विराटनं जो रूटच्या विरुद्ध रिव्यू घेतला होता. वास्तविक हा रिव्यू न घेण्याचा सल्ला पंतनं विराटला (Rishabh Pant DRS Video) दिला होता. विराटनं त्याकडं दुर्लक्ष करत पुन्हा एका रिव्यू घेतला. पण, त्याचा निर्णय पुन्हा एकदा चुकीचा ठरला. टीम इंडियानं घेतलेल्या मागच्या 24 रिव्ह्यूपैकी 21 रिव्ह्यू फुकट घालवले आहेत, तर फक्त 3 रिव्ह्यू टीम इंडियाच्या बाजूने आले. डीआरएसच्या बाबतीत विराट बहुतेकवेळा चुकीचाच ठरत आहे. कॉमेंटेटर्सनीही विराट बॉलर्सचं ऐकून लवकर रिव्ह्यू घेतो, असं मत व्यक्त केलं आहे. IND vs ENG: विराट कोहलीनं केली निवृत्तीची घोषणा! वाचा Viral Tweet चे सत्य इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने पुन्हा एकदा झुंजार शतक केलं. रूट 180 रनवर नाबाद राहिला. मुळे पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला 27 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे. भारताकडून मोहम्मद सिराजला 4 विकेट मिळाल्या, तर इशांत शर्माला (Ishant Sharma) 3 आणि मोहम्मद शमीला (Mohamad Shami)  2 विकेट मिळाल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या