लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्टला (India vs England 2nd Test) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली आहे. पाच टेस्टच्या सीरिजमधील नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली. आता दुसरी टेस्ट जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. पहिल्या टेस्टनंतर दोन्ही टीमना दुखापतींचा फटका बसला असून त्यांनी अंतिम 11 जणांमध्ये बदल केले आहेत.
लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने (Joe Root) टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या टेस्टमध्ये टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी झाल्यानं त्याच्या जागी अनुभवी इशांत शर्माचा (Ishant Sharma) टीममध्ये समावेश करण्यात आलाय. भारतीय टीम या टेस्टमध्येही चार फास्ट बॉलर्ससह उतरली आहे. तर रविंद्र जडेजा हा टीममधील एकमेव स्पिनर असेल.
इशांत शर्माचा लॉर्ड्सवर रेकॉर्ड चांगला असल्यानं त्याची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. टीम इंडियानं 2014 साली लॉर्ड्सवर टेस्ट जिंकली होती. इशांत शर्मा त्या विजयाचा हिरो होता. 74 रन देत 7 विकेट्स ही इशांतची करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी याच मैदानावर आहे.
नॉटिंघम टेस्टमध्ये अश्विनच्या ऐवजी जडेजाला पसंती देण्यात आली होती. जडेजानं लॉर्ड्सवर एकमेव टेस्ट 2014 साली खेळली होती. त्या टेस्टमध्ये त्यानं तीन विकेट्ससह दुसऱ्या इनिंगमध्ये 68 रनची खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून फॉर्मात असलेल्या जडेजानं नॉटिंघम टेस्टमध्ये 56 रन काढले होते. त्याच्या बॅटिंगमधील योगदानामुळेच पुन्हा एकदा टीम इंडियातील एकमेव स्पिनर म्हणून जडेजावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड दोन्ही टीमला ICC चा झटका, 'ती' चूक पडली महाग
टीम इंडियानं लॉर्ड्सवर 18 टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी फक्त 2 टेस्ट जिंकल्या असून 12 मध्ये पराभव झाला आहे. अन्य 4 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. भारतीय टीमनं लॉर्ड्सवर 2014 साली शेवटचा विजय मिळवला होती. आता सात वर्षांनंतर पुन्हा एकदा विजय मिळवण्याची संधी टीम इंडियाला आहे.
टीम इंडियाची Playing 11 : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
इंग्लंडची Playing 11 : रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, हसीब हमीद, जो रुट, जोनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, मार्क वूड आणि जेम्स अँडरसन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england