मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : इंग्लंडला नाही विजयाची खात्री, दिग्गज क्रिकेटपटूला वाटतेय 'ही' भीती

IND vs ENG : इंग्लंडला नाही विजयाची खात्री, दिग्गज क्रिकेटपटूला वाटतेय 'ही' भीती

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  यांनी केलेल्या झुंजार पार्टनरशिपमुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये रंगत वाढली आहे.

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी केलेल्या झुंजार पार्टनरशिपमुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये रंगत वाढली आहे.

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी केलेल्या झुंजार पार्टनरशिपमुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये रंगत वाढली आहे.

लॉर्ड्स, 16 ऑगस्ट : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  यांनी केलेल्या झुंजार पार्टनरशिपमुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये रंगत वाढली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 6 आऊट एवढा झाला होता, त्यामुळे भारताकडे आता 154 रनची आघाडी आहे. ऋषभ पंत 14 रनवर आणि इशांत शर्मा 4 रनवर नाबाद खेळत आहेत. चौथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंड आघाडीवर आहे, असं चित्र असलं तरी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनाच त्यांच्या विजयाची खात्री वाटत नाही.

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) याने ही भीती बोलून दाखवली आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंड वरचढ आहे. पण ऋषभ पंतनं शेवटच्या दिवशी एक तास बॅटींग केली. तर सर्व परिस्थिती बदललेल,' असं भाकित वॉननं केलंय. ऋषभ पंतनं या मालिकेतील 3 इनिंगमध्ये 76 रन केले असले तरी इंग्लंडच्या टीमला त्याचा धास्ती आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात आणि इंग्लंडला भारतामध्ये हरवण्यात पंतची भूमिका मोलाची होती.

टीम इंडियानं चौथ्या दिवशी तीन विकेट गमावल्यानंतर पुजारा आणि रहाणे यांनी किल्ला लढवला.  केएल राहुल 5 रनवर, रोहित शर्मा 21 रनवर आणि विराट कोहली 20 रनवर आऊट झाले. मार्क वूडने (Mark Wood) भारताच्या दोन्ही ओपनरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, तर सॅम करनने (Sam Curran) विराटची विकेट घेतली.

IND vs ENG : लॉर्ड्स टेस्ट जिंकण्याची टीम इंडियाला संधी, इंग्लंडचं टेन्शन वाढलं!

लंचनंतरच्या सत्रामध्ये भारताने एकही विकेट गमावली नाही, पण चहानंतर सेट झालेले रहाणे, पुजारा आणि रवींद्र जडेजा माघारी परतले. अजिंक्य रहाणे 61 रनवर, चेतेश्वर पुजारा 41 रनवर आणि रवींद्र जडेजा 3 रनवर आऊट झाले. मार्क वूडने पुजाराला तर मोईन अलीने रहाणे-जडेजाला आऊट केलं. आता पाचव्या दिवशी टीम इंडियाची सर्व भिस्त ऋषभ पंतवर आहे. पंतच्या खेळामुळे टीम इंडियाला 200 पेक्षा जास्त आघाडी मिळाली तर इंग्लडला विजयासाठी संघर्ष करावा लागू शकतो.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs england