Home /News /sport /

IND vs ENG : मोहम्मद सिराज आणि सॅम करनमध्ये भर मैदानात चकमक, पाहा VIDEO

IND vs ENG : मोहम्मद सिराज आणि सॅम करनमध्ये भर मैदानात चकमक, पाहा VIDEO

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिली टेस्ट सध्या रंगदार अवस्थेत आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि इंग्लंडचा ऑल राऊंडर सॅम करन (Sam Curran) यांच्यात भर मैदानात शाब्दिक चकमक झाली.

पुढे वाचा ...
    नॉटिंघम, 8 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिली टेस्ट सध्या रंगदार अवस्थेत आहे. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 95 रनची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडनं दुसऱ्या इनिंगमध्ये 303 पर्यंत मजल मारली. टीम इंडियाला विजयासाठी 209 रनचं टार्गेट असून चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय टीमनं 1 आऊट 52 पर्यंत मजल मारली आहे. आता पाचव्या दिवशी ही टेस्ट जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय टीमला आणखी 157 रनची आवश्यकता आहे. नॉटिंघम टेस्टच्या चौथ्या दिवशी दोन्ही टीममध्ये जोरदार खेळ रंगला. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) शतक झळकावले. भारताकडून जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) 5 विकेट्स घेतल्या.  या खेळाच्या दरम्यान दोन्ही टीममधील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि इंग्लंडचा ऑल राऊंडर सॅम करन (Sam Curran) यांच्यात ही चकमक झाली. इंग्लंडनं तेव्हा 150 रनची आघाडी घेतली होती. तसंच जो रूट आणि सॅम करन जोडीची वाटचाल 250 ची आघाडी घेण्याच्या दिशेनं सुरु होती. भारतीय टीमसाठी नेहमीच डोकेदुखी ठरणारा सॅम करन पुन्हा एकदा मैदानात सेट झाला होता. मोहम्मद सिराजच्या ओव्हरमध्ये सॅम करननं एक फोर लगावला. त्यानंतर वैतागलेल्या सिराजनं करनला उद्देशून काही शब्द वापरले. त्याला करननंही उत्तर दिलं. या दोघांमधील वाद आणखी वाढण्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) पुढे येऊन सिराजला बाजूला नेलं.  या चकमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. IND vs ENG : इंग्लंडमध्ये दाखल होताच सूर्या लागला कामाला, अँडरसनचा सामना करण्याची तयारी सुरू सॅम करननं सिराजच्या पुढच्या ओव्हरमध्येही फोर लगावला. दोघांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षात अखेर सिराजनं बाजी मारली. सिराजला करनची विकेट मिळाली नाही. पण, बुमराहच्या बॉलिंगवर करनचा कॅच त्यानेच पकडला. तो 32 रनवर आऊट झाला. करन आऊट होताच इंग्लंडचा 250 रनची आघाडी घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांना दुसऱ्या इनिंगमध्ये 208 रनची आघाडी मिळाली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या