मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : इंग्लंडच्या कॅप्टननं संपवला 35 महिन्यांचा दुष्काळ, पहिल्या टेस्टमध्ये रंगत वाढली

IND vs ENG : इंग्लंडच्या कॅप्टननं संपवला 35 महिन्यांचा दुष्काळ, पहिल्या टेस्टमध्ये रंगत वाढली

इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) पुन्हा एकदा भारतीय बॉलरची डोकेदुखी बनला आहे. नॉटींघम टेस्टच्या दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावत 35 महिन्यांचा दुष्काळ संपवला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑगस्ट : इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) पुन्हा एकदा भारतीय बॉलरची डोकेदुखी बनला आहे. नॉटिंघम टेस्टमधील (India vs England, 1st Test) पहिल्या इनिंगमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर रूटनं दुसऱ्या डावात शतक झळकावलं आहे. हे त्याचं टेस्ट क्रिकेटमधील 21 वे शतक असून इंग्लंडमध्ये तब्बल 35 महिन्यांनी शतक झळकावण्यात त्याला यश आले आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दोन विकेट्स झटपट गेल्यानंतर रूट बॅटींगला आला. त्यावेळी त्याने फक्त इंग्लंडच्या इनिंगला सावरलंच नाही तर वेगानं रन करत भारतीय बॅट्समनला बॅकफुटवर ढकललं.

जो रुटनं 98 बॉलमध्ये डोम सिब्लीसोबत अर्धशतकाची भागिदारी केली. त्यानं 8 फोरच्या मदतीनं 68 बॉलमध्ये त्याचे अर्धशतक पूर्ण केले. रूटला यावेळी दुसऱ्या बाजूनं फार साथ मिळाली नाही. डोम सिब्ली 133 बॉलमध्ये 28 रन काढून आऊट झाला. जॉनी बेअरस्टो वेगानं रन काढण्याच्या नादात 30 रनवर परतला. डॅन लॉरेन्स 25, तर जोस बटलर 17 रन काढून आऊट झाले.

रूटनं टी ब्रेकनंतर 21 वे शतक पूर्ण केले. त्याचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. रुटनं भारताविरुद्ध आतापर्यंत 6 शतक आणि 11 अर्धशतक झळकावली आहेत. भारताविरुद्ध त्याची सरासरी जवळपास 58 आहे. नॉटिंघम टेस्टच्या पहिल्या दिवशी देखील त्यानं 64 रनची खेळी केली होती. त्यामुळेच इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 183 पर्यंत मजल मारली.

दुसऱ्या इनिंगमध्येही रुटच्या झुंजार शतकामुळे इंग्लंडनं 303 रन काढले. भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. मोहम्मद शमीलाही एक विकेट मिळाली

Tokyo Olympic 2020 : 80 हजार टन मोबाईलपासून तयार करण्यात आली ऑलिम्पिक मेडल

इंग्लंडने दिलेल्या 209 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने केएल राहुलच्या (KL Rahul) रुपात एकमेव मोहरा गमावला. 26 रन करून स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगवर राहुल आऊट झाला. चौथ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियानं 1 आऊट 52 रन केले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) 12 रनवर आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 12 रनवर नाबाद खेळत आहे. भारताला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी 157 रनची गरज आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england