मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : बुमराहनं केली दोन दिग्गजांची बरोबरी, 'ही' कामगिरी करणारा तिसरा भारतीय

IND vs ENG : बुमराहनं केली दोन दिग्गजांची बरोबरी, 'ही' कामगिरी करणारा तिसरा भारतीय

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नॉटिंघम टेस्टवर टीम इंडियाचं वर्चस्व आहे. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) भेदक बॉलिंगमुळे हे वर्चस्व मिळालं आहे. बुमराहानं यावेळी दोन भारतीय दिग्गजांची बरोबरी केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नॉटिंघम, 8 ऑगस्ट :  भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नॉटिंघम टेस्टवर टीम इंडियाचं वर्चस्व आहे. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) भेदक बॉलिंगमुळे हे वर्चस्व मिळालं आहे.  त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये 5 तर या टेस्टमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या बॉलिंगमुळे इंग्लंडची पहिली इनिंग 183 तर दुसरी इनिंग 303 रनवर संपुष्टात आली. चौथ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियानं 1 आऊट 52 रन केले आहेत. त्यामुळे आता ही टेस्ट जिंकण्यासाठी आणखी 157 रनची टीम इंडियाला गरज आहे.

बुमराहनं नॉटिंघम टेस्टमध्ये 110 रन देत 9 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहसह  फक्त तीन भारतीय बॉलर्सना इंग्लंडमध्ये 9 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स मिळवण्यात यश आलंय. चेतन शर्मानं 1986 साली बर्मिंगहम टेस्टमध्ये 188 रन देत 10 विकेट्स घेतल्या होत्या. ती टेस्ट त्यावेळी ड्रॉ झाली. तर झहीर खाननं 2007 साली नॉटिंघममध्येच 107 रन देत 9 विकेट्स घेतल्या. टीम इंडियानं तेव्हा 7 विकेट्सनं मॅच जिंकली होती. याचाच अर्थ इंग्लंडमध्ये जेव्हा भारतीय बॉलर्सनी 9 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत त्यावेळी टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. आता ही परंपरा कायम ठेवत बुमराहची कामगिरी व्यर्थ ठरणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी टीम इंडियावर आहे.

टीम इंडिया करणार विक्रम

टीम इंडियाची इंग्लंड विरुद्ध ही 127 वी टेस्ट आहे. यापैकी 29 टेस्ट टीमनं जिंकल्या असून 48 मध्ये पराभव झाला आहे. तर 49 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. टीम इंडियानं नॉटिंघममध्ये टेस्ट जिंकली तर हा त्यांचा इंग्लंड विरुद्धचा 30 वा विजय असेल. यापूर्वी फक्त तीन टीमनं इंग्लंड विरुद्ध 30 किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट जिंकल्या आहेत.

विराटच्या सहकाऱ्यानं शाकिब अल हसनच्या ओव्हरमध्ये लगावले 5 सिक्स! युवराजची आली आठवण

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियानं सर्वात जास्त 146 टेस्ट जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजनं 58 आणि दक्षिण आफ्रिकेनं 34 टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आता इंग्लंड विरुद्ध 30 टेस्ट जिंकणारी एकूण चौथी आणि पहिली आशियाई टीम होण्याची संधी भारतीय टीमला आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Jasprit bumrah