• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : विराटनं अश्विनच्या जागी जडेजाला का निवडलं? हरभजननं सांगितलं कारण

IND vs ENG : विराटनं अश्विनच्या जागी जडेजाला का निवडलं? हरभजननं सांगितलं कारण

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नॉटिंघममध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियात रवीचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) जागी रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संधी मिळाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 5 ऑगस्ट :  भारत विरुद्ध इंग्लंड  (India vs England) यांच्यात नॉटिंघममध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियात रवीचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) जागी रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संधी मिळाली आहे.  जडेजा हा पहिल्या टेस्टमध्ये खेळणारा टीम इंडियाचा एकमेव स्पिनर आहे. अश्विनच्या जागी जडेजाला संधी मिळाल्यानं अनेकांनी धक्का बसला होता. सोशल मीडियावर या प्रकरणात विराटला चांगलंच टार्गेट करण्यात आले. त्यानंतर विराटच्या मदतीसाठी हरभजन सिंग (Harbhahjan Singh) धावून आला आहे. त्याने विराटनं जडेजाला पसंती का दिली याचं कारण सांगितलं आहे. 'इंग्लंडच्या फास्ट पिचवर स्पिनर्सचा वापर क्वचितच केला जाईल. त्यामुळे विकेट-टू- विकेट बॉलिंग आणि चांगली बॅटींग करणाऱ्या रविंद्र जडेजाला नेहमीच अश्विनच्या जागी पसंती दिली जाईल. अश्विनला टीममध्ये घेतलं तर लोअर ऑर्डर वाढते. स्पिन बॉलर्सची गरज किती लागेल हे माहिती नाही. स्पिन बॉलिंगची गरज जडेजा पूर्ण करु शकतो. विदेशातील पिचवर जडेजानं चांगली बॅटींग केली आहे. त्याची कामगिरी टीमसाठी उपयुक्त आहे. त्याच्यामुळे होणाऱ्या बॅटींगमधील फायद्याकडं दुर्लक्ष करता कामा नये. टीम मॅनेजमेंट या पद्धतीनं विचार करत असेल तर ते योग्य आहे.' असे हरभजनने स्पष्ट केले. IND vs ENG : विराटला केली सचिननं मदत, कारण समजल्यावर वाटेल मास्टर-ब्लास्टरचा अभिमान! भारतीय बॉलर्सचा भेदक मारा भारतीय फास्ट बॉलर्सच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची पहिली इनिंग 183 रनवर संपुष्टात आली.  टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीनं 3 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. शार्दूल ठाकूरनं 2 तर सिराजनं 1 विकेट घेत, या टेस्टसाठी त्यांची केलेली निवड योग्य ठरवली. जडेजानं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 ओव्हरचं बॉलिंग केली. त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.
  Published by:News18 Desk
  First published: