हिटमॅन आणि धवन 19 वर्षीय गोलंदाजासमोर फेल, काही चेंडूत झाले आऊट!

हिटमॅन आणि धवन 19 वर्षीय गोलंदाजासमोर फेल, काही चेंडूत झाले आऊट!

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यासमोर दिग्गज गोलंदाजांची भंबेरी उडते. मात्र, या दोघांनाही एका 19 वर्षीय गोलंदाजाने चकीत केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना गोलंदाजी करताना भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटतो. दोघे जेव्हाही फॉर्ममध्ये असतात तेव्हा दिग्गज गोलंदाजांचेसुद्धा काहीच चालत नाही. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या टी 20 सामन्याआधी दोन्हींना एका 19 वर्षीय गोलंदाजानं बाद केलं.

रोहित शर्माला ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह आवरला नाही. आणि यावर तो बाद झाला. त्यानंतर काहीच मिनिटांनी शिखर धवन त्रिफळाचित झाला. रोहित त्याच्या आळशीपणामुळे तर धवन आक्रमकपणामुळे बाद झाला. या दोघांनाही बाद करणाऱा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेला नाही. टी20 सामन्यापूर्वी नेट प्रॅक्टिसवेळी एकाच गोलंदाजाने दोघांनाही बाद केलं.

दिल्लीचा 19 वर्षीय वेगवान गोलंदाज केशव डबास स्वत: या दोघांना बाद केल्यानंतर हैराण झाला. दोघांची विकेट घेतल्यावर केशवला काय आणि कसं व्यक्त व्हावं हेसुद्दा कळलं नाही. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रोहित आणि धवनला बाद केलेल्या केशवनं सांगितलं की, ही एक चांगली भावना आहे. आता काय बोलू हेच कळत नाही. केशवचे कौतुक मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील केलं. त्यांनी शार्दुल ठाकुरकडे तो कोणत्या क्लबमध्ये खेळतो अशी चौकशी केली होती.

रवी शास्त्रींनी केलेल्या कौतुकाबद्दल केशवला विचारलं तेव्हा तो म्हणाला की, मी शास्त्री सरांची प्रतिक्रिया नाही पाहिली. पण शार्दुल ठाकुरने मला विचारलं होतं की मी कोणत्या क्लबसाठी खेळतो. भारतीय क्रिकेटपटूंना गोलंदाजी करण्याची संधी केशवला पहिल्यांदाच मिळाली होती. याआधी वर्षाच्या सुरुवातीला तो भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघासाटी नेट बॉलर होता.

गोलंदाजाला टाकलं गोंधळात, पाठ दाखवून मारला चौकार; VIDEO पाहिलात का?

केशव त्याच्या कुटुंबातील सर्वात लहान आहे. चार महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर कुटुंब आर्थिक संकटात सापडलं होतं. केशवची मोठी बहिण आणि भावाच्या नोकरीमुळे जास्त अडचण आली नाही. केशव म्हणतो की, देशासाठी क्रिकेट खेळायचं असून अजुन बराच पल्ला गाठायचा आहे. आशा आहे की एक दिवसं माझं स्वप्न पूर्ण होईल.

सोशल मीडियावर अनुष्का का आणि कुणावर संतापली, पाहा SPECIAL REPORT

Published by: Suraj Yadav
First published: November 3, 2019, 1:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading