IND vs AUS: 'शास्त्रींच्या जागेवर असता तर, काय केलं असतं?,' ऑस्ट्रेलियन कोचनं हे दिलं उत्तर

‘टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या जागेवर असता तर काय केलं असतं?’, असा प्रश्न ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच जस्टीन लँगर (Justin Langer) यांना विचारण्यात आला होता.

‘टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या जागेवर असता तर काय केलं असतं?’, असा प्रश्न ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच जस्टीन लँगर (Justin Langer) यांना विचारण्यात आला होता.

  • Share this:
    मेलबर्न, 24 डिसेंबर:  'अ‍ॅडलेड (Adelaide) टेस्टमध्ये 36 रन्सवर ऑल आऊट झालेल्या टीम इंडियाबद्दल (Team India) सहानुभूती असली तरी 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी पाहुणी टीम दबावात असल्याचा आनंद आहे', अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लँगरनं (Justin Langer) व्यक्त केली आहे.  विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी सज्ज असल्याचा इशाराही लँगरनं दिला आहे. शास्त्रींच्या जागेवर असता तर... ‘टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या जागेवर असता तर काय केलं असतं?’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी,  'माझा याच्याशी काही संबंध नाही. मी यापूर्वी खूप तणाव सहन केला आहे. विरोधी टीमच्या सध्याच्या मानसिकतेची मला कल्पना आहे. भारतीय टीम सध्या दबावात आहे. त्याचबरोबर या ख्रिसमसच्या आठवड्यात आमच्यावर कोणताही दबाव नाही, याचा मला आनंद आहे', हे उत्तर लँगरनी दिले. (हे वाचा-IPL 2022 च्या हंगामात एकमेकांना भिडणार 10 संघ, BCCI च्या बैठकीत निर्णय) विराट कोहली आणि मोहम्मद शमीची अनुपस्थिती टीम इंडियाला जाणवेल असा दावा त्यांनी केला. 'कोणत्याही खेळात टीममधील दोन स्टार खेळाडू बाहेर असतील तर टीमला त्यांची कमतरता जाणवते. विराट कोहली महान खेळाडूंपैकी एक आहे, तर शमी अत्यंत प्रतिभासंपन्न आहे. त्यांच्या अनुपस्थितीचा आम्हाला फायदा होईल,' असा दावा त्यांनी केला. (हे वाचा-धोनीनं कॅप्टन झाल्यानंतर लगेच निवड समितीच्या सदस्याला दिलं होतं मोठं आश्वासन!) 'अजिंक्य रहाणे हा नवा कॅप्टन आहे, त्यामुळे त्याच्यावर पहिल्या दिवसापासून दबाव टाकण्याचा आमचा प्रयत्न असेल', असे संकेत लँगर यांनी दिले. वॉर्नर कधी खेळणार? ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) तिसऱ्या टेस्टमध्ये खेळेल अशी आशा लँगर यांनी यावेळी व्यक्त केली. डेव्हिड वॉर्नर गेल्या महिन्यात भारताविरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, यानंतर सिडनीमध्येच त्याच्यावर उपचार सुरू होते. सिडनीमध्ये वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे वॉर्नर प्रायव्हेट जेटने मेलबर्नला दाखल झाला होता. मात्र अजूनही तो दुखापतीमधून पूर्णपणे बरा झालेला नसल्यानं दुसऱ्या टेस्टमधून आऊट झाला आहे. (हे वाचा-2 बॉलमध्ये हॅट्रिकची जादू करणारा 49 वर्षांचा मुंबईकर होणार 'या' स्पर्धेत सहभागी) ‘टीम पेनवर पूर्ण विश्वास’ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनच्या (Tim Paine) बॅटिंगची सध्या चर्चा आहे. या प्रश्नावरही लँगरने उत्तर दिले. 'ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक विकेटकिपरची तुलना ही गिलख्रिस्टशी केली जाते. गिलख्रिस्ट महान खेळाडूंपैकी एक होता. त्यानं खेळाचं स्वरुपच बदललं. पेन देखील चांगला खेळाडू असून माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे,' असे लँगरने स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published: