ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण टी. नटराजनने बुमराह प्रमाणेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर नटराजनची सुरुवातीला नेट बॉलर म्हणू टीममध्ये निवड झाली होती. त्यानंतर वरुण चक्रवर्ती जखमी झाल्याने त्याची सुरुवातीला टी 20 मध्ये निवड झाली. वन-डे सीरिज सुरु होण्याच्या काही तास आधी नटराजनची नवदीप सैनीचा बॅक अप बॉलर म्हणून वन-डे टीममध्ये निवड करण्यात आली. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहची देखील 2015-16 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच बदली खेळाडू म्हणून टीममध्ये पहिल्यांदा निवड झाली होती. शेवटच्या मॅचमध्ये पदार्पण टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी देखील वन-डे सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नटराजनने कॅनबेरा वन-डे मध्ये पदार्पण केले. तर बुमराहने 2016 साली सिडनीमध्ये झालेल्या वन-डे मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले होते. योगायोगाची आणखी एक बाब म्हणजे या दोन्ही वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाने फक्त शेवटची एकच मॅच जिंकली होती. विकेट्सही समान नटराजन आणि बुमराहाच्या कामगिरीमधील समानता इथेच संपत नाही. दोघांनीही त्यांच्या पहिल्या वन-डे आणि टी-20 मॅचमध्ये समान विकेट्स घेतल्या आहेत. वीरेंद्र सेहवागने या विलक्षण योगायोगाकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष वेधले असून आता नटराजनने बुमराहच्या जवळ जाणारी कामगिरी केली तरी ते टीम इंडियाच्या हिताचे असेल अशी आशा व्यक्त केली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket