Home /News /sport /

IND vs AUS : विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं कोव्हिड प्रोटोकॉल तोडला?

IND vs AUS : विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं कोव्हिड प्रोटोकॉल तोडला?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियातील (Team India) पाच खेळाडूंनी बायो बबलचा भंग केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक वाद समोर आला आहे.

  मेलबर्न, 4 जानेवारी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियातील (Team India) पाच खेळाडूंनी बायो बबलचा भंग केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक वाद समोर आला आहे. भारतामध्ये परतण्यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी देखील बायो बबलचं (Bio Bubble) उल्लंघन केल्याचा दावा आता करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियन मीडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. काय आहे प्रकरण? ‘विराट आणि हार्दिक हे दोघं  7 डिसेंबर रोजी बेबी शॉपमध्ये मास्क न घालता गेले होते. पण हे किरकोळ प्रकरण असल्यानं याबाबतची तक्रार करण्यात आली नव्हती’, अशी माहिती ऑस्ट्रेलियन मीडियानं दिली आहे. याबाबतचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे.
  हे वाचा-टीम इंडियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रवाना हार्दिक पांड्या वन-डे आणि टी-20 टीमचा सदस्य होता. तर विराट कोहली पहिल्या टेस्टनंतर भारतामध्ये परतला आहे. टी-20 सीरिजमधील शेवटची मॅच 8 डिसेंबर रोजी झाली होती. त्याच्या एक दिवस आधी या दोघांनी बेबी शॉपमध्ये जावून खरेदी केली अशी माहिती आहे. Covid 19 च्या प्रोटोकॉलनुसार खेळाडूंनी बाहेर पडताना मास्क घालणे आवश्यक आहे. यापूर्वी नव्या वर्षी टीम इंडियाचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले. त्यामुळे खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं असा त्यांच्यावर आरोप झाला होता. नवलदीप सिंह नावाच्या एका चाहत्यांनं ट्वीट करून ही अफवा पसरवली होती. त्यानं भारतीय संघातील खेळाडूंच्या जेवनाचं बिलही भरल्याचा दावा केला. तसेच यावेळी रिषभ पंतला मिठी मारली असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. पण या त्याच्या चुकीचा भारतीय संघाला होणारा त्रास पाहता त्यानं ट्वीटरवर माफी मागितली आहे. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'मी त्यांना भेटलो मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन केलं आहे. रिषभने मला मिठी मारली ही बाब मी भावनेच्या भरात म्हटलं असल्याचंही नवलदीपनं म्हटलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket

  पुढील बातम्या