सिडनी, 11 जानेवारी: जखमी हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांची खेळपट्टीवर उभी राहण्याची जिद्द आणि सयंमी बॅटिंगमुळे भारतानं सिडनी टेस्ट ड्रॉ केली आहे. ही टेस्ट ड़्रॉ झाल्यानं सध्या ही सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. आता या सीरिजचा फैसला चौथ्या टेस्टमध्ये होईल.
चेतेश्वर पुजारा आऊट झाल्यानंतर विहारी-अश्विन जोडी जमली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सर्व बॉलर्सचा धैर्यानं सामना केला. टेस्ट क्रिकेटमध्ये पाचव्या दिवशी बॅटिंग करणं हे आव्हान होतं. ते आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललं. विहारी 161 बॉलमध्ये 23 तर अश्विन 128 बॉलमध्ये 39 रन काढून नाबाद राहिला. या दोघांची ही अविस्मरणीय झुंज क्रिकेट फॅन्सच्या नेहमीच स्मरणात राहणार आहे.
3rd Test. It's all over! Match drawn https://t.co/xHO9oit5X4 #AUSvIND
— BCCI (@BCCI) January 11, 2021
पंत-पुजाराची भागिदारी
यापूर्वी पाचव्या दिवशी सकाळी चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत या जोडीनं चौथ्या विकेट,ठी 148 रनची पार्टरनरशिप केली. या पार्टरनरशिपमुळेच मॅचचं चित्र बदललं. पहिल्या इनिंगमध्ये जखमी झालेल्या पंतनं दुसऱ्या इनिंगमध्ये आक्रमक खेळ केला. पंतची सेंच्युरी फक्त 3 रननं हुकली. त्यानं 118 बॉलमध्ये 12 फोर आणि 3 सिक्सरच्या मदतीनं 97 रन काढले. तर पुजारानं 205 बॉलमध्ये 77 रनची संयमी खेळी केली.
पंत आणि पुजारा आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. ही टेस्ट जिंकून आघाडी घेण्याचं त्यांचं स्वप्न विहारी-अश्विन जोडीनं पूर्ण होऊ दिलं नाही. अवघड परिस्थितीमध्ये कमबॅक करत ही टेस्ट ड्रॉ केल्याचा फायदा टीम इंडियाला पुढच्या टेस्टमध्ये होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia