IND vs AUS: सुनील गावसकरांच्या टीकेला टीम पेनचं उर्मट उत्तर!

IND vs AUS: सुनील गावसकरांच्या टीकेला टीम पेनचं उर्मट उत्तर!

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेन (Tim Paine) याच्या सिडनी टेस्टधील वागणुकीवर भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी टीका केली होती. त्यावर टीम पेननं प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

ब्रिस्बेन, 14 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेन (Tim Paine) याच्या सिडनी टेस्टधील वागणुकीवर भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी टीका केली होती. त्यावर टीम पेननं प्रतिक्रिया दिली आहे. गावसकर यांच्या मताचा मला काहीही फरक पडत नाही, असं उर्मट उत्तर पेननं दिलं आहे.

काय म्हणाले होते गावसकर?

सिडनी टेस्टच्या दरम्यान पेननं आर. अश्विनवर (R. Ashwin) टीप्पणी केली होती. त्यावर  “एका राष्ट्रीय टीमच्या कॅप्टनला ही वागणूक शोभत नाही. कॅप्टन म्हणून त्याचे आता मोजकेच दिवस उरले आहेत,’’ अशी टीका गावसकर यांनी केली होती.

‘मला काही फरक पडत नाही’

ब्रिस्बेन टेस्टपूर्वी पेन याला या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “ ते त्यांचं मत मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत. मला त्याचा काहीही फरक पडत नाही. गावसकर यांना जे बोलायचं आहे, ते त्यांनी बोलावं. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांच्याशी वादविवाद करण्याची माझी इच्छा नाही.’’ असं उत्तर पेन यानं दिलं आहे.

सिडनी टेस्टमधील व्यवहारांबद्दल पेननं यापूर्वीच माफी मागितली आहे. “मी 99 टक्के क्रिकेट सावधगिरीनं खेळलो आहे. त्यामुळेच मी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करु शकतो. त्या दिवशी मी भावनेच्या भरात आलो. मी प्रेक्षकांकडं पाहिलं तेंव्हा मला टेस्ट मॅचमध्ये टीमची कॅप्टनसी करत असल्याची जाणीव झाली. मी खूप क्रिकेट खेळेन आणि जिंकण्याच्या उद्देशानं खेळेल, असं स्वप्न नेहमी पाहिलं होतं,’’ असं पेन यानं सांगितलं.

स्टंप माईक पासून सावध राहणार

यापुढे टेस्ट मॅच खेळताना स्टंप माईकपासून सावध राहणार असल्याचं पेननं सांगितलं. “अंपायर, अधिकारी आणि खेळाडू यांच्याबद्दल सन्मान दाखवणे आवश्यक आहे, असं त्यानं मान्य केलं. “सिडनी टेस्टमध्ये झालेल्या वादाचा स्मिथवर कोणताही परिणाम होणार नाही. मागच्या तीन वर्षांमध्ये त्यानं काय सहन केलं आहे, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यानंतर तो सरळ फॉर्ममध्ये परतला आणि अ‍ॅशेस मालिकेत चांगला खेळ केला,’’ याची आठवण पेननं करुन दिली.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading