सिडनी, 9 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये तिसरी टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं 94 रनची आघाडी घेतली आहे. या मालिकेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियानं भारतावर पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी चांगली सुरु असलेली टेस्ट त्यांचा कॅप्टन टीम पेनसाठी (Tim Paine) निराशाजनक ठरली. पेन पहिल्या डावात फक्त एक रन काढून बुमराहच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्याचबरोबर पहिल्या डावात दोनदा DRS घेतला. दोन्ही वेळेस त्याचा निर्णय चुकला.
सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी मार्नस लाबुशेनचा (Marnus Labuschange) बॉल ऋषभ पंतनं (Rishabh Pant) लेग साईडला खेळला. तो बॉल पंतच्या बॅट जवळून टीम पेनच्या हातामध्ये विसावला. आपण कॅच घेतली अशी पंतला पक्की खात्री होती. त्यामुळे मैदानारील अंपायरनं अपिल फेटाळताच त्यानं DRS घेतला. थर्ड अंपायरनं पंतला नॉटआऊट घोषित केलं.
पेननं वापरले अपशब्द!
यापूर्वी चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) विरुद्ध पेननं DRS घेतला होता. पुजारानं खेळण्याचा प्रयत्न केलेला एक बॉल पंतनं पकडला. त्यावेळी त्याचं अपिल अंपायर पॉल विल्सन यांनी फेटाळलं. या निर्णयाच्या विरुद्ध पेननं DRS घेतला. यावेळी हॉटस्पॉट आणि स्निकोवरही बॉल बॅटला लागल्याचा कोणाताही ठोस पुरावा आढळला नाही.
स्निकोवर थोडसं स्पाईक झाल्याचं आढळलं होतं. त्यामुळे थर्ड अंपायनं मैदानातील अंपायरला याबाबतचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यावर विल्यन यांनी आपला पूर्वीचाच निर्णय कायम ठेवत पेनचं अपिल फेटाळलं. या निर्णयानंतर पेननं अंपायर विल्सन यांना उद्देशून अपशब्द वापरले. यावेळी पेननं विल्सन यांना दुसऱ्या टेस्टची आठवण करुन दिली.
First ball and we've got a review!
— News Cricket (@NewsCorpCricket) January 9, 2021
Australia lose a review trying to prize out Pujara. Another fantastic decision by the umpire #AUSvIND pic.twitter.com/k1coiuhI1W
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
मेलबर्नमध्ये काय झालं होतं?
मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या डावात पेन अशाच पद्धतीनं आऊट झाला होता. रविंद्र जडेजाच्या बॉलवर पेनचा ऋषभ पंतनं कॅच घेतला. मैदानातील अंपायर पॉल रायफल यांनी त्यावरील अपिल फेटाळलं. त्यानंतर टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन अजिंक्य रहाणेनं DRS चा निर्णय घेतला होता. त्यावेळी थर्ड अंपायरनं सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर पेन आऊट असल्याचं जाहीर केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia