IND vs AUS: ब्रिस्बेन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीमध्ये पुन्हा बदल!

IND vs AUS:  ब्रिस्बेन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीमध्ये पुन्हा बदल!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ब्रिस्बेन टेस्टला 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.

  • Share this:

ब्रिस्बेन, 14 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील ब्रिस्बेन टेस्टला 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या शेवटच्या टेस्टला निर्णायक महत्त्व प्राप्त झालं आहे. या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.

सिडनी टेस्टमधील ऑस्ट्रेलियाचा ओपनर विल पुकोवस्की (Will Pucovski) ब्रिस्बेन टेस्ट खेळणार नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) दिली आहे. पुकोवस्कीच्या जागेवर मार्कस हॅरिसचा (Marcus Harris) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

बॉर्डर – गावसकर ट्रॉफीमधील तिसरी टेस्ट सिडनीमध्ये झाली. टीम इंडियानं (Team India) जोरदार प्रदर्शन करत ती टेस्ट ड्रॉ केली. या टेस्टमध्ये फिल्डिंग करताना पुकोवस्कीचा खांदा दुखावला होता. त्यामुळे त्याला अन्य खेळाडूंच्या मदतीनं बाहेर नेण्यात आलं होतं.

यापूर्वीही झाला होता जखमी!

पुकोवस्कीनं सिडनीमध्येच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं पहिल्या डावात 62 तर दुसऱ्या डावात 10 रन केले होते. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात  कार्तिक त्यागीने टाकलेला बॉल पुकोवस्कीच्या डोक्याला लागल्यानं तो जखमी झाला होता.

ऑस्ट्रेलियाचा पाचवा ओपनर!

मार्कस हॅरिस हा या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा पाचवा ओपनर असेल. यापूर्वी जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड यांनी पहिल्या दोन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची सुरुवात केली होती. त्यानंतर सिडनीमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की ही नवी ओपनिंग जोडी ऑस्ट्रेलियानं उतरवली. न्यूझीलंडविरुद्ध 1985-86 साली झालेल्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच एका मालिकेत इतके ओपनर वापरले आहेत.

या मालिकेतील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं आठ विकेट्सनं जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियानं कमबॅक करत मेलबर्न टेस्ट जिंकली. सिडनी टेस्ट भारतीय बॅट्समननं चार सत्र खेळून ड्रॉ केली होती. त्यामुळे ब्रिस्बेन टेस्ट ड्रॉ झाली तरी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारताकडंच राहणार आहे.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading