IND vs AUS: पहिल्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये एक बदल ‘या’ ऑलराऊंडरची निवड

IND vs AUS: पहिल्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये एक बदल ‘या’ ऑलराऊंडरची निवड

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियन टीममध्ये सातत्यानं बदल होत आहेत. टीममध्ये निवड झालेले खेळाडू एकापाठोपाठ दुखापतग्रस्त होत असल्यानं हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (Cricket Australia) हे बदल करावे लागत आहेत.

  • Share this:

सिडनी, 14 डिसेंबर:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियन टीममध्ये सातत्यानं बदल होत आहेत. टीममध्ये निवड झालेले खेळाडू एकापाठोपाठ दुखापतग्रस्त होत असल्यानं हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (Cricket Australia) हे बदल करावे लागत आहेत. अ‍ॅडलेड टेस्टच्या दोन दिवस आधी ऑस्ट्रेलियन टीममध्ये आणखी एक बदल करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियन टीममध्ये आता ऑलराऊंडर मोईसेस हेनरिक्स (Moises Henriques) समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सोमवारी ही घोषणा केली. फास्ट बॉलर सीन एबॉट (Sean Abbott) जखमी झाल्यानं हेनरिक्स टीममध्ये निवड झाली आहे. हेनरिक्स भारत अ (India A) विरुद्ध झालेला दुसरा सराव सामना स्नायू दुखावल्यानं खेळू शकला नव्हता. मात्र, सोमवारी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो पास झाल्यानं त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सीन एबॉट आता सिडनीमध्येच थांबणार असून तो दुसऱ्या टेस्टपूर्वी फिट होण्याची अपेक्षा आहे.

हेनरिक्स ऑस्ट्रेलियाकडून 2016 साली शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी त्याचं टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दरम्यानच्या काळात तो सातत्यानं टी20 क्रिकेट खेळला आहे.

हे वाचा-आयपीएलपूर्वी भारतात होणार 'ही' मोठी स्पर्धा

ऑस्ट्रेलियासाठी चांगली बातमी!

दुखापतींच्या चक्रात अडकलेल्या ऑस्ट्रेलियन टीमसाठी एक चांगली बातमी आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर कॅमेरुन ग्रीन आता बरा होत असून तो पहिल्या टेस्टसाठी उपलब्ध असल्याची शक्यता वाढली आहे. ऑस्ट्रेलियाचा मेन फास्ट बॉलर मिचेल स्टार्कदेखील टीममध्ये परतला आहे. स्टार्कने कौटुंबीक कारणामुळे टी 20 मालिकेतून माघार घेतली होती.

भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेत स्टार्क फारसा प्रभाव टाकू शकला नव्हता. मात्र पिंक बॉल टेस्टमध्ये  स्टार्कचा जबरदस्त रेकॉर्ड आहे. त्याने या प्रकारात आजवर 42 विकेट्स घेतल्या आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 14, 2020, 12:48 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या