Home /News /sport /

IND vs AUS: 'ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मानं वजन कमी केलं!' माजी क्रिकेटपटूचा खुलासा

IND vs AUS: 'ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मानं वजन कमी केलं!' माजी क्रिकेटपटूचा खुलासा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) नुकताच टीममध्ये दाखल झाला आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) स्पर्धेच्या दरम्यान रोहितला दुखापत झाली होती.

    मुंबई, 1 जानेवारी :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)  कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) नुकताच टीममध्ये दाखल झाला आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) स्पर्धेच्या दरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहित युएईमधून भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलियाला न जाता मुंबईत परतला होता. रोहित ऑस्ट्रेलियात कधी जाणार? यावर बरीच चर्चा सुरु होती. बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (NCA)  फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर रोहितला ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळाली. यापूर्वी देखील 2020 मध्ये रोहित दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध वन-डे आणि टेस्ट सीरिज खेळू शकला नव्हता. NCA मध्ये केली जबरदस्त तयारी रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला नियमित दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा फिटनेस चांगला करण्याच्या उद्देशानंच रोहित NCA मध्ये आला होता, अशी माहिती टीम इंडियाचा माजी बॉलर प्रग्यान ओझानं (Pragyan Ojha) दिली आहे. रोहितनं वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले असल्याचं ओझानं सांगितलं. (हे वाचा: बेन स्टोक्सच्या पोस्टनंतर ICC नं मागितली माफी, वाचा काय आहे प्रकरण) ओझानं ‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे की, “रोहित शर्मानं 14 दिवस क्वारंटाईमध्ये घालवले आहेत. त्यामुळे त्याला सध्या सरावाची गरज आहे. भरपूर सरावानंतरच तो ऑस्ट्रेलियातील परिस्थितीशी जुळवून घेऊ शकेल. रोहितचं आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान थोडं वजन वाढलं होतं. हे वजन कमी करण्यावर त्यानं NCA मध्ये भर दिला,’’ अशी माहिती ओझानं दिली आहे. बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिल्यानं आपले अनेक खेळाडू या सीझनमध्ये दुखापतग्रस्त झाले आहेत. कदाचित याच कारणामुळे रोहितची पूर्णपणे ‘मॅच फिट’ होण्याची इच्छा होती. रोहितला मैदानावर कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी NCA मधील प्रत्येकाचं रोहितच्या फिटनेस तयारीवर लक्ष होतं’’, असंही ओझानं सांगितलं. (हे वाचा: विराट, स्मिथला मागं टाकल्यानंतर विल्यमसनची सर्वांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया) भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज सुरु असताना रोहित शर्मा सिडनीमध्ये दाखल झाला होता. सिडनीमध्ये 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो मेलबर्नमध्ये टीममध्ये दाखल झाला आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये रोहित खेळणार हे जवळपास निश्चित असून मयंक अग्रवाल किंवा हनुमा विहारी यापैकी एका जागेवर त्याची टीममध्ये निवड होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या