मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: ब्रिस्बेन टेस्ट जिंकण्यासाठी भारतासमोर 328 रनचं टार्गेट!

IND vs AUS: ब्रिस्बेन टेस्ट जिंकण्यासाठी भारतासमोर 328 रनचं टार्गेट!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथी टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 328 रनचं टार्गेट आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 294 रनवर संपुष्टात आली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथी टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 328 रनचं टार्गेट आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 294 रनवर संपुष्टात आली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथी टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 328 रनचं टार्गेट आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 294 रनवर संपुष्टात आली.

ब्रिस्बेन, 18 जानेवारी :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथी टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 328 रन्सचं रनचं टार्गेट आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 294 रनवर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाकडं पहिल्या डावात 33 रन्सची आघाडी होती.

चौथ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी खेळ पुढे सुरु केला. या मालिकेत फारशी कमाल न केलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner) सकाळी मुडमध्ये होता. त्यानं आक्रमक सुरुवात केली. शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) मार्कस हॅरिसला आऊट करुन ही जोडी फोडली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं वॉर्नला आऊट केलं. वॉर्नरचं अर्धशतक हे फक्त 2 रननं हुकलं.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथनं अर्ध शतक झळकावलं. स्मिथ 55 रन काढून आऊट झाला. त्याला मोहम्मद सिराजनं आऊट केलं. भारताच्या मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या फास्ट बॉलर्सनी उत्तम मारा केल्यानं त्यानंतर ठराविक अंतरानं ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडल्या. भारताकडून मोहम्मद सिराजनं सर्वात जास्त 5 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूरनं 4 विकेट्स घेऊन त्याला चांगली साथ दिली.

(वाचा - भारताचे दिग्गज स्पिनर चंद्रशेखर यांची तब्येत खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल!)

ब्रिस्बेनमध्ये पावसाचा अडथळा!

ब्रिस्बेन टेस्टमध्ये हवामानाच्या अंदाजानुसार पावसाचा अडथळा आला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 आऊट 243 अशी होती त्यावेळी मॅचमध्ये पावसाचा अडथळा आला. पावसामुळे लवकर टी ब्रेक घेण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर लगेच मिचेल स्टार्कला सिराजनं आऊट केलं.

भारताला पुन्हा ‘33’ चा योग

ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 33 रनची आघाडी घेतली होती. भारतीय टीमच्या फॅन्ससाठी 33 या आकड्याचं खास महत्त्व आहे. 2003-04 च्या दौऱ्यात अ‍ॅडलेड टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियानं भारतावर पहिल्या डावात फक्त 33 रनची आघाडी घेतली होती. भारतीय टीमनं त्यानंतर दुसऱ्या डावात आणखी कामगिरी उंचावत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता पुन्हा 17 वर्षांनी तो योग जुळून आला आहे.

(वाचा - विराट कोहलीने ‘ट्विटर Bio’ वरुन भारतीय क्रिकेटपटू हा उल्लेख काढला!)

ऑस्ट्रेलियानं फक्त अ‍ॅडलेडमध्ये नाही तर 1979-80 च्या कानपूर टेस्टमध्ये भारतावर 33 रनची आघाडी घेतली. त्या टेस्टमध्ये देखील भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे कानपूर, अ‍ॅडलेडमध्ये जे घडलं ते ब्रिस्बेनमध्येही करण्याची ऐतिहासिक संधी भारतीय टीमला आहे.

First published:

Tags: Cricket, India vs Australia