Home /News /sport /

IND vs AUS: टीम इंडियानं मेलबर्नमध्ये केलं न्यू इयर सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

IND vs AUS: टीम इंडियानं मेलबर्नमध्ये केलं न्यू इयर सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

संपूर्ण जग नव्या वर्षाचं स्वागत करत असताना ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये असलेले टीम इंडियाचे (Team India) खेळाडू देखील त्यामध्ये सहभागी झाले होते.

  मेलबर्न, 1 जानेवारी : संपूर्ण जग नव्या वर्षाचं स्वागत करत असताना ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये असलेले टीम इंडियाचे (Team India) खेळाडू देखील त्यामध्ये सहभागी झाले होते. भारतीय टीमचे बहुतेक खेळाडू हे आयपीएल (IPL ) आणि ऑस्ट्रेलिया दौरा यामुळे चार महिन्यांपेक्षा जास्त देशाच्या बाहेर आहेत. टीम इंडियाचा बॅट्समन के.एल. राहुल (K.L. Rahul) यांनी या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. यावेळी तो जसप्रीत बुमराह, मयांक अग्रवाल आणि भारतीय टीमच्या काही सपोर्ट स्टाफसोबत दिसतोय. नवे वर्ष, नवी भावना, नव्या संधी, तेच स्वप्न नवी सुरुवात 2021’’ असं कॅप्शन त्यानं या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टला दिलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

  भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) नं देखील त्यांच्या सर्व फॉलोअर्सना नव्या वर्षाच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या आहेत.
  टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंनी देखील नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

  रोहित शर्माचा कसून सराव टीम इंडियाला सिडनी टेस्टपूर्वी नव वर्षाच्या निमित्तानं दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. या ब्रेकमध्येही रोहित शर्मा (Rohit Sharma)  कसून सराव करत आहे. रोहित दुखापतीनंतर टीममध्ये परतला आहे. तो 30 तारखेला टीममध्ये सहभागी झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्यानं सरावाला सुरुवात केली आहे. बॅटींग कोच आणि काही सपोर्ट स्टाफच्या मदतीनं रोहित सध्या सराव करत आहे. शार्दूलला मिळणार संधी? भारतीय टीमला लागलेलं दुखापतींचं ग्रहण अजून सुटलेलं नाही. दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आता उमेश यादवची (Umesh Yadav) भर पडली आहे. उमेश दुखापतीमुळे या स्पर्धेतून आऊट झाला आहे. यापूर्वी पहिल्या टेस्टनंतर मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली होती. आता उमेशच्या जागी मुंबईकर शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) सिडनी टेस्टमध्ये संधी मिळू शकते, असं वृत्त PTI नं दिलं आहे. शार्दूलला संधी मिळाल्यास तो सिडनीमध्ये त्याच्या कसोटी काराकीर्दीमधील दुसरी टेस्ट खेळेल. यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतामध्ये तो एक टेस्ट खेळला आहे. मात्र त्या टेस्टमध्ये तो बॉलिंग टाकण्यापूर्वीच जखमी झाला होता.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket

  पुढील बातम्या