Home /News /sport /

IND vs AUS: टीम इंडियामधून उमेश यादव आऊट, ‘या’ बॉलरला मिळाली संधी

IND vs AUS: टीम इंडियामधून उमेश यादव आऊट, ‘या’ बॉलरला मिळाली संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट आधी टीम इंडियाला (India vs Australia) आणखी एक धक्का लागला आहे. फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) उरलेल्या दोन्ही मॅचमध्ये खेळू शकणार नाही.

    मेलबर्न, 1 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट आधी टीम इंडियाला (India vs Australia) आणखी एक धक्का लागला आहे. फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) उरलेल्या दोन्ही मॅचमध्ये खेळू शकणार नाही. उमेश यादवच्या जागी टी. नटराजनचा (T. Natarajan) उर्वरित दोन टेस्टसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. BCCI नं त्यांच्या ट्विटर हँडलवर ही घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न टेस्टच्या तिसऱ्या दिवशी उमेश यादवला दुखापत झाली होती. पोटरीला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये उमेश यादव लयीमध्ये होता. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने जो बर्न्सला माघारी धाडलं, या इनिंगमध्ये त्याला फक्त 3.3 ओव्हरच करता आल्या. हे वाचा-IND vs AUS: टीम इंडियानं मेलबर्नमध्ये केलं न्यू इयर सेलिब्रेशन, पाहा PHOTOS नटराजनची दिमाखदार कामगिरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये नटराजन याने दिमाखदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्य वनडे सीरिजमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये नटराजन याने 70 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये नटराजनला 6 विकेट मिळाल्या. याआधी मोहम्मद शमीला देखील पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला बॉल लागल्यामुळे दुखापत झाली होती, त्यामुळे तोदेखील टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला होता. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी इशांत शर्मालादेखील दुखापत झाल्यामुळे तोही या दौऱ्यामधून आऊट झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या