IND vs AUS : विराट कोहलीच्या ‘या’ कृतीमुळे टी. नटराजन झाला होता भावुक!

IND vs AUS : विराट कोहलीच्या ‘या’ कृतीमुळे टी. नटराजन झाला होता भावुक!

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी. नटराजननं (T. Natarajan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात सर्व प्रकारात पदार्पण करणारा तो एकमेव भारतीय बनला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी. नटराजननं (T. Natarajan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात पदार्पण केलं. खरं तर आपल्यालाही एका प्रकारात पदार्पण करण्याची अपेक्षा नव्हती, अशी कबुली टी. नटराजननं रविवारी दिली आहे. त्यामुळे भारताकडून पहिली मॅच खेळताना त्याच्यावर दबाव होता. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये नटराजनची निवड झाली होती. त्यानंतर एकाच दौऱ्यात सर्व प्रकारात पदार्पण करणारा तो एकमेव भारतीय बनला आहे.

नटराजननं त्याच्या गावी पत्रकारांशी बोलताना ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा अनुभव शेअर केला आहे. “मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण करायाला मिळेल ही आशा नव्हती. तू खेळणार आहेस हे मला पहिल्यांदा सांगितलं त्यावेळी मला दडपण आलं होतं. मला संधीचा फायदा घ्यायचा होता. आंतरराष्ट्रीय मॅच खेळणं आणि त्यामध्ये विकेट घेणं हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं होतं.  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)  यांच्यात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या निर्णायक टेस्टमध्ये नटराजनननं तीन विकेट्स घेतल्या. भारताच्या ऐतिहासिक विजयात त्याचंही योगदान होतं.

तेंव्हा झाला होता भावूक!

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही कॅप्टनसोबत खेळणं हा चांगला अनुभव होता, असं नटराजननं सांगितलं. या दोघांनीही मला प्रोत्साहन दिलं तसंच चांगल्या प्रकारे सांभाळून घेतलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची T20 ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटनं ती ट्रॉफी माझ्या हातामध्ये सोपावली तो खूप हळवा क्षण होता. त्यावेळी माझे डोळे भरुन आले होते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याचा अनुभव सुरुवातीला अवघड होता. मात्र नंतर त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं असं नटराजननं सांगितलं.

नटराजनचं जल्लोषात स्वागत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून (Australia cricket match) विजयश्री मिळवल्यानंतर नटराजन मागील आठवड्यात मायदेशी परत आला. तो तामिळनाडूमधील (Tamilnadu) सलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी गावी पोचला. त्यावेळी त्याचं  अतिशय जल्लोषात स्वागत झालं. इथं त्याच्यासाठी चक्क घोड्याचा रथ आणला होता. या बग्गीवर त्याला मिरवत-मिरवत घरी नेण्यात आलं. या सगळ्या मिरवणुकीत त्याला शेकडो चाहत्यांनी सतत घेरलेलं होतं.

Published by: News18 Desk
First published: January 25, 2021, 1:36 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या