मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : टीम इंडियाच्या कामगिरीला सेहवाग-जाफरने केलं ट्रोल, तर गावसकर म्हणाले...

IND vs AUS : टीम इंडियाच्या कामगिरीला सेहवाग-जाफरने केलं ट्रोल, तर गावसकर म्हणाले...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची (Team India) दुसरी इनिंग ही फक्त 36 रन्सवर संपुष्टात आली. भारतीय टीमच्या या लज्जास्पद कामगिरीचे क्रिकेट विश्वात जोरदार पडसाद उमटले आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 डिसेंबर :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची (Team India) दुसरी इनिंग ही फक्त 36 रन्सवर संपुष्टात आली. भारताची टेस्ट क्रिकेटमधील ही निचांकी धावसंख्या आहे. भारतीय टीमच्या या लज्जास्पद कामगिरीचे क्रिकेट विश्वात जोरदार पडसाद उमटले आहेत. गावसकरांनी केला बचाव भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर ( Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचा बचाव केला आहे. गावसकर यांनी ‘चॅनल 7’ शी बोलताना भारतीय बॅट्समन्सचा बचाव केला. “एखाद्या दिवशी बॉलिंग अशी काही होते की बॅट्समन काहीच करु शकत नाही’’, असे गावसकर यांनी सांगितले. “ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली. 1974 च्या लॉर्ड्स टेस्टमध्येही बॉल स्विंग होत होता. त्यामुळे परिस्थिती बिकट होती. आमची टीम एकही खराब फटका न खेळता ऑल आऊट झाली होती. आमचे बॅट्समन LBW आणि बोल्ड झाले होते. जेंव्हा तुम्ही या प्रकारच्या बॉलिंगचा सामना करता त्यावेळी रन काढणे अवघड असते. टीम इंडियासोबत अ‍ॅडलेडमध्येही तेच झाले,’’ असं सांगत गावसकर यांनी भारतीय टीमचा बचाव केला आहे. वीरेंद्र सेहवागने केले ट्रोल! माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) मैदानाप्रमाणे सोशल मीडियावरही (Social Media)  फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या खराब कामगिरीनंतर सेहवागनं त्याच्या खास स्टाईलमध्ये ट्विट करत टीम इंडियाला ट्रोल केले. सेहवागने 4920408401 हे टीम इंडियाच्या बॅट्समन्सनी दुसऱ्या इनिंगमध्ये काढलेले रन ट्विट करत हा विसरण्याचा ओटीपी (OTP) आहे, अशी उपरोधिक टीका केली आहे. मुंबईकर वासिम जाफरने (Wasim Jaffer ) देखील त्याच्या शैलीत ट्विट करत टीम इंडियाच्या खेळाचं वर्णन केले आहे. जाफरची ट्विट करण्याची एक खास शैली असून त्या शैलीमुळे तो सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट 26 डिसेंबर पासून मेलबर्नमध्ये सुरु होणार आहे. अ‍ॅडलेडचा पराभव विसरुन नव्यानं भरारी घेण्याचं आव्हान टीम इंडियासमोर मेलबर्न टेस्टमध्ये असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या