सिडनी, 11 जानेवारी : जवळपास दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बॉलशी छेडछाड केल्याबद्दल स्टीव्ह स्मिथवर (Steve Smith) एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. भारताविरुद्ध सिडनीमध्ये सुरु असलेल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी स्मिथ खेळपट्टी खराब करताना रंगेहात सापडला आहे. खिलाडू वृत्तीला काळिमा फासणारं स्मिथचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
काय घडला प्रकार?
सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) मैदानात येताच खेळाची सूत्रं हाती घेतली. पंत एका बाजूनं आक्रमण करत होता, तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) दुसऱ्या बाजूनं त्याला साथ देत होता. ऑस्ट्रेलियन बॉलर्सना या जोडीनं चांगलंच हतबल केलं होतं.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी स्पिनर नॅथन लायननं (Nathan Lyon) या दोघांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळत नव्हतं. ज्या खेळपट्टीवर लायन अवलंबून आहे, त्याचीही त्याला मदत मिळत नव्हती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमनं जे केलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
After drinks break Aussie comes to shadow bat and scuffs out the batsmen's guard marks.
Rishabh Pant then returns and has to take guard again.#AUSvIND #AUSvsIND #AUSvINDtest pic.twitter.com/aDkcGKgUJC — Cricket Badger (@cricket_badger) January 11, 2021
स्मिथ जुना गुन्हेगार
ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू बॅट्समनचे मार्क पायानं मिटवताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शेवटच्या दिवशी ड्रिंक्स ब्रेक सुरु असताना 49 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू ते काम करत होता. ही जर्सी दुसऱ्या कोणत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूची नाही. तर त्यांचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथची आहे. स्मिथच्या या कृतीमुळे त्याच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याची ही कृती ICC च्या नियमांचं उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे त्याच्यावर ICC काही कारवाई करणार का? हा प्रश्न देखील आता विचारला जात आहे. स्मिथची ही कृती सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाली आहे.
मॅच जिंकण्यासाठी रडीचा डाव खेळणे ही स्मिथची जुनी सवय आहे. 24 मार्च 2018 या दिवशी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये कॅमेरुन बॅनक्राफ्ट बॉलवर सँड पेपर रगडताना सापडला होता. त्यानंतर या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia