IND vs AUS: शेन वॉर्नकडून पुजाराचा वर्णद्वेषी उल्लेख, क्रिकेट फॅन्स संतापले!

IND vs AUS: शेन वॉर्नकडून पुजाराचा वर्णद्वेषी उल्लेख, क्रिकेट फॅन्स संतापले!

ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर शेन वॉर्ननं (Shane Warne) कॉमेंट्री करत असताना भारताचा बॅट्समन चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) ‘स्टीव्ह’ असा उल्लेख केला. त्याच्या या उल्लेखामुळे क्रिकेट फॅन्स संतापले असून वॉर्ननं माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

  • Share this:

अ‍ॅडलेड, 17 डिसेंबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या टेस्टसाठी कॉमेंट्री करणारा ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) वादामध्ये सापडला आहे. ‘फॉक्स क्रिकेट’साठी (Fox Cricket) कॉमेंट्री करताना शेन वॉर्ननं भारताचा बॅट्समन चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) ‘स्टीव्ह’ असा उल्लेख केला. त्याच्या या उल्लेखामुळे क्रिकेट फॅन्स संतापले असून वॉर्ननं माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

चेतेश्वर पुजारा इंग्लंडमधील यॉर्कशायर (Yorkshire) टीमकडून कौंटी क्रिकेट खेळला आहे. पुजारा आशियाई खेळाडू असल्याने आणि त्याच्या कातडीचा रंग पाहून त्याला ‘स्टीव्ह’ अशी हाक मारली जात असे, असा दावा यॉर्करशायरच्या माजी कर्मचाऱ्यानं काही दिवसांपूर्वी केला होता. शेन वॉर्नने कॉमेंट्री करताना याचा उल्लेख करत पुजाराला हसत स्टीव्ह असे म्हंटले. त्यामुळे क्रिकेट फॅन्स चिडले आहेत.

पुजाराचा खंबीर खेळ

शेन वॉर्ननं कॉमेंट्री करताना वर्णद्वेषी उल्लेख केला असला तरी पुजारानं अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी त्याच्या नेहमीच्या शैलीत खंबीर खेळ केला. पृथ्वी शॉ अगदी दुसऱ्या बॉलवर आऊट झाल्यानं पुजाराला पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंगला यावं लागलं होतं.

पुजारानं सुरुवातीला मयांक अग्रवाल आणि नंतर विराट कोहलीच्या मदतीनं सावध खेळ केला. त्याने सुरुवातीच्या दोन सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाला वरचढ होऊ दिलं नाही. तो अखेर 160 बॉल्समध्ये 43 रन्सची खेळी करुन आऊट झाला. भारतानं 2008-09 साली ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. टीम इंडियाच्या त्या विजयाचा पुजारा शिल्पकार होता.

Published by: News18 Desk
First published: December 18, 2020, 3:58 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading