सिडनी, 11 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border - Gavaskar Trophy) तिसरी टेस्ट सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या (Team India) हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांनी सहाव्या विकेटसाठी 256 बॉलची नाबाद पार्टरनरशिप केली. या खेळीच्या दरम्यान हे दोघंही जखमी झाले, तरीही त्यांचा निर्धार ढळला नाही. त्यांनी सिडनीचं मैदान राखलं. ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.
टीम इंडियाचं कमबॅक
सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता.ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 338 रन काढले. त्यानंतर टीम इंडिया पहिल्या इनिंगममध्ये 244 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं दुसरी इनिंगमध्ये 6 आऊट 312 रन केले आणि टीम इंडियासमोर विजयासाठी 407 रनचं अवघड टार्गेट ठेवलं.
या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीचा फायदा भारताला झाला नाही. चौथ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियानं 2 आऊट 98 रन केले होते. त्यानंतर पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रात कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) झटपट आऊट झाला.
पंत-पुजारानं रचला पाया!
अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 148 रनची पार्टरनरशिप केली. हा एक भारतीय रेकॉर्ड आहे. या पार्टरनरशिपनं पाचव्या दिवशी सिडनी टेस्ट वाचवण्याचा पाया रचला होता. पंत (97) आणि पुजारा (77) रन काढून आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजय डोळ्यासमोर दिसत होता.
विहारी-अश्विनची लढाई!
पुजारा आऊट झाल्यानंर हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या जोडीनं मॅच वाचवण्याचं आव्हान स्विकारलं. रविंद्र जडेजा जखमी असल्यानं या दोघांनंतर एकही प्रमुख बॅट्समन शिल्लक नव्हता. विहारीनं स्नायूच्या (Hamstring) दुखापतीनंतरही किल्ला लढवला. त्याला नीट पळता येत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. तरीही तो खेळत होता.
विहारीची अश्विननं खंबीर साथ दिली. अश्विनही बॅटींग करताना जखमी झाला. ही जोडी फोडण्याचे ऑस्ट्रेलियन बॉलर्सचे प्रयत्न त्यानं यशस्वी होऊ दिले नाहीत. या दोन्ही खेळाडूंनी दाखवलेल्या धैर्याची सध्या जोरदार प्रशंसा होत आहे.
He has a hamstring injury, can't run and is playing a very brave and gutsy innings for his team. https://t.co/BTb7uX5eqT
— Harsha Bhogle (@bhogleharsha) January 11, 2021
So much desperateness .. Wade throws ball straight onto the Body of #Vihari .. Australia trying everything to break this solid partnership between #Ashwin and #Vihari ..@BCCI#INDvAUS #INDvsAUSTest #AUSvINDtest #Australia #Pujara pic.twitter.com/zaKocrrkhC
— Apoorv mishra (@anchor_apoorv) January 11, 2021
We should appreciate the determination and patience of Hanuma Vihari. Despite the hamstring injury, he is still at the crease - 7* from 120 balls !! 🔥🔥 The beauty of test cricket !! Really mean it..@Hanumavihari#TeamIndia #AUSvINDtest #Vihari #Ashwin #AUSvIND pic.twitter.com/VCW6WmklEd
— Jebin Mathew (@Im_JEBIN) January 11, 2021
#Vihari 🙌🙌🙌🙌🙌🙌 he is doing a excellent job here . he is not even walking properly due to hamstring still giving his best. he is not playing for himself , he is playing for team.❤️#Ausvsindia #AUSvINDtest #Ashwin #kotigobba3 #VikranthRona pic.twitter.com/XRzxRUHm1Z
— Prutivi (@Prutivi1kiccha) January 11, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार टेस्टची सीरिज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकली होती. त्यानंतर दुसरी टेस्ट भारतानं जिंकली. आता चौथी आणि शेवटची टेस्ट 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia