मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी पंतची सेंच्युरी थोडक्यात हुकली

IND vs AUS: सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी पंतची सेंच्युरी थोडक्यात हुकली

‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ हे क्रिकेटमधील तत्व काय असतं हे ऋषभ पंतनं (Rishabh Pant) दाखवून दिलं आहे. सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी पंतची सेंच्युरी फक्त 3 रननं हुकली

सिडनी, 11 जानेवारी:  ‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ हा क्रिकेटमधील मंत्र काय असतो हे ऋषभ पंतनं (Rishabh Pant) दाखवून दिलं आहे. सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी पंतची सेंच्युरी फक्त 3 रननं हुकली. पंतनं  12 फोर आणि 3 सिक्सरच्या मदतीनं 118 बॉलमध्ये 97 रन काढले.  पंतला पहिल्या इनिंगमध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर जिद्दीनं मैदानात उतरत त्यानं ही दमदार खेळी केली आहे.

सिडनीमध्ये पंत बॉस!

सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या स्टेडियमवर (SCG) पंतचा रेकॉर्ड जबरददस्त आहे. त्यानं याच मैदानावर 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध  नाबाद 159 रनची खेळी केली होती. आता पुन्हा एकदा दोन वर्षांनी पंतनं सिडनीमध्ये  तो शतकाच्या उंबरठ्यावर आऊट झाला. पंतचं शतक हुकलं असलं तरी त्याची ही खेळी सर्वांच्या बराच काळ आठवणीत राहणार आहे.

हे वाचा-IND vs AUS: टीम इंडिया बहाणेबाज, रिकी पाँटींगची कडवट टीका

ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर

अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) झटपट आऊट करत ऑस्ट्रेलियाच्या टीमनं सुरुवात जोरदार केली होती. त्यानंतर ऋषभ पंतनं त्यांना बॅकफुटवर ढकललं. हनुमा विहारीच्या जागेवर त्याला प्रमोशन देण्यात आलं होतं. टीम मॅनेजमेंटचा हा विश्वास त्यानं सार्थ ठरविला. पंतनं या मालिकेतील पहिलं अर्धशतक 64 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केलं.  अर्धशतकानंतरही त्याचा खेळण्यातला ओघ थांबला नाही. त्याला 56 रनवर एक जीवदान मिळालं. त्याचाही पंतनं फायदा उठवला.

चेतेश्वर पुजारा एका बाजूनं संयमी खेळी करत असून दुसऱ्या बाजूनं पंत आक्रमक खेळत होता. दोन भिन्न शैलीतल्या या फलंदाजांच्या एकत्र प्रयत्नामुळे पाचव्या दिवशी टीम इंडिया जोरदार लढत देत आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs Australia