मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: ऋषभ पंतचं अर्धशतक, टीम इंडियाची जोरदार लढत

IND vs AUS: ऋषभ पंतचं अर्धशतक, टीम इंडियाची जोरदार लढत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) झुंजार अर्धशतक झळकावलं आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) झुंजार अर्धशतक झळकावलं आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) झुंजार अर्धशतक झळकावलं आहे.

सिडनी, 11 जानेवारी :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) झुंजार अर्धशतक झळकावलं आहे. पंतच्या अर्धशतकामुळे 407 रनच्या विशाल लक्ष्यचा पाठलाग करताना टीम इंडिया जोरदार लढत देत आहे. पंतच्या अर्धशतकामुळे पाचव्या दिवशी लंचपर्यंत टीम इंडियानं 3 आऊट 206 पर्यंत मजल मारली आहे.

पाचव्या दिवशी खराब सुरुवात

पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या जोडीनं खेळ पुढे सुरु केला. या अनुभवी जोडीकडून भारताला मोठी अपेक्षा होती. कॅप्टन रहाणेला ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. रहाणे कालच्या धावसंख्येत एकही रननची भर न टाकता 4 रनवरच आऊट झाला. त्याला नॅथन लायननं आऊट केलं.

पंतला प्रमोशन

रहाणे आऊट झाल्यानंतर हनुमा विहारीच्या जागी ऋषभ पंतला प्रमोशन देण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला. संयमी पुजारा आणि आक्रमक पंत ही जोडी चांगलीच जमली. पुजारा एका बाजूनं संयमी खेळ करत आहे. तर दुसरिकडं ऋषभ पंतनं त्याच्या नैसर्गिक शैलीत फटकेबाजी सुरु केली.

पंतच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियन बॉलर्सना बॅकफुटवर ढकलण्यात टीम इंडियाला यश आलं. त्यानं या मालिकेतील पहिलं अर्धशतक 64 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केलं. सिडनीच्या मैदानावरच 2019 साली ऋषभ पंतनं शतक झळकावलं होतं. त्या खेळीची आठवण करुन देणारी खेळी पंतनं पाचव्या दिवशी खेळली आहे. पंत आणि पुजारा जोडीनं पाचव्या विकेटसाठी 100 रनची पार्टरनरशिप देखील पूर्ण केली आहे.

पंतचा ऑस्ट्रेलियात भक्कम रेकॉर्ड!

ऋषभ पंतचा ऑस्ट्रेलियात टेस्ट क्रिकेटमध्ये रेकॉर्ड हा भक्कम आहे. त्यानं सलग दहा इनिंगमध्ये 25 पेक्षा जास्त रन केले आहेत. ऑस्ट्रेलियात हा रेकॉर्ड करणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू आहे. . याआधी वॅली हेमंड, रुसी सुरती आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी लागोपाठ 8 इनिंगमध्ये हा रेकॉर्ड केला होता. सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पंत 36 रन काढून आऊट झाला होता.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs Australia