मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सच्या चुकीवर रिकी पाँटिंग बरसला!

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सच्या चुकीवर रिकी पाँटिंग बरसला!

ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सनी अश्विनविरुद्ध (R. Ashwin) केलेल्या बॅटिंगने त्यांचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंग (Ricky Ponting) हा निराश झाला आहे. अश्विननं पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेतल्या.

अ‍ॅडलेड, 19 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 191 वर संपुष्टात आली. फास्ट बॉलर्सना मदत करणाऱ्या या पिचवर भारताकडून ऑफ स्पिनर आर. अश्विन ( R. Ashwin) हा सर्वात यशस्वी बॉलर्स ठरला. अश्विननं स्टीव्हन स्मिथसह चार विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सनी अश्विनविरुद्ध केलेल्या बॅटिंगने त्यांचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंग (Ricky Ponting) हा निराश झाला आहे. पाँटिंग हा अश्विन सदस्य असलेल्या दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) टीमचा कोच देखील आहे.

‘अति आक्रमकता नडली’

पाँटिंगने चॅनल 7 (Channel 7) शी बोलताना सांगितले की, “आमचे बॅट्समन्स अश्विनच्या विरुद्ध गरजेपक्षा जास्त आक्रमक दिसत होते. त्यांनी अश्विनला कमी लेखलं, मात्र आपण अव्वल दर्जाचे बॉलर असल्याचं त्याने दाखवले. अश्विनच्या विरुद्ध रन्स बनवण्याचा त्यांचा प्रयत्न अंगाशी आला.

अश्विननं पहिल्या इनिंगंध्ये 18 ओव्हर्समध्ये 55 रन देत चार विकेट्स घेतल्या. अश्विनच्या या कामगिरीच्या जोरावर भारताला पहिल्या इनिंगमध्ये 53 रन्सची आघाडी मिळाली.

'लायन ठरणार धोकादायक!'

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफ स्पिनर नॅथन लायन (Nathan Lyon) या मालिकेत धोकादायक ठरु शकतो, असा इशारा पाँटिंगने दिला आहे. लायन क्रिझचा उत्तम वापर करत बॉलिंग करतो. तो भारताच्या विरुद्धचा यशस्वी स्पिनर आहे. त्याने टेस्टमध्ये अन्य बॉलर्सच्या तुलनेत विराट कोहलीला जास्त वेळा आऊट केले आहे. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये पुजाराला चांगलेच सतावले होते. उजव्या हातानं खेळणाऱ्या बॅट्समन्सच्या विरुद्ध त्याचा बॉल जास्त स्पिन होतो. त्यामुळे जवळच्या फिल्डर्सच्या मदतीनं तो प्रत्येक बॉलवर विकेट घेऊ शकतो,’’ असे मत पॉन्टिंगने व्यक्त केले आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket